मुंबई : सोशल मिडीयावर काही वेळा मजेशीर व्हीडीओ व्हायरल होत असतात. असाच एक गंमतीदार व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यात एक बदक मस्त पैकी मटकत चालताना दिसत आहे. या बदकाची चाल पाहून तुम्हाला वाटेल काय टुमकत चाललंय की असं वाटेल जणू एखादी मॉडेलच कॅटवॉक करतेय. व्हिडीओमधील बदकाचा हा कॅटवॉक पाहून त्याची सोशल मिडीयावर चांगलीच वाह..वाह होत आहे.
सोशल मिडीयावर मागे एका कावळ्याचा बाल्कनीतला व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो कावळाही कंबर लचकवत चालला होता. आता हा नवीन व्हीडीओ एका बदकाचा असून या बदकाने रस्त्याने चालताना अशी काही स्टाईल मारली आहे की कोणतीही मॉडेल त्याच्या कॅटवॉकसमोर फिकी पडेल.
एका रस्त्यावर एक बदक अगदी मॉडेल जशा रॅम्पवर चालतात तसे चालल्याचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. त्याला पाहून असे वाटते की कोणी मॉडेलची हा कॉपी करतोय की काय ? असा भास होत आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून मजा येईल. हा व्हिडीओ सोशल मिडीयात खूपच व्हायरल होत आहे.
Top model.. ? pic.twitter.com/IWrbNPzxmS
— Buitengebieden (@buitengebieden) February 9, 2023
या व्हिडीओला पाहून लोक मजेदार कमेंट करीत आहेत. कोणी याची तुलना जगातील टॉप मॉडेलशी करीत आहे. तर कोणी बॉलीवू़डच्या हिरोईनशी त्याची तुलना करीत आहे. या व्हिडीओला एका इंटरनेट युजरने ट्वीटरवर शेअर केले आहे. या युजरने या व्हिडीओला शेअर करताना कॅप्शन लिहीली आहे की, ‘ टॉप मॉडेल’ ! तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही सूचतेय का ते पाहा…
अशी कॅप्शन लिहिण्यामागील या बदकाची चालच आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की योग्य कॅप्शन आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये दिसणारे बदक इतक्या अप्रतिम शैलीत चालताना दिसत आहे, ते पाहून तुम्हाला वाटेल की हा व्हिडीओ खोटा आहे की काय ? तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही. बदकही असे चालू शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही. व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत की बदकाला प्रशिक्षण देण्यात आले होते. तर काही लोक म्हणत आहेत की ही बदकाची चालच भारी आहे.