मुंबई : आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग असणाऱ्या इजिप्तमधील सुएझ कालव्यात (Suez Canal) एक अवाढव्य जहाज अडकून पडले आहे. त्यामुळे या जलमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे जहाज कालव्यात रुतले असून ते बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही सुरु आहेत. सुएझ कालव्यातील जलवाहतूक ठप्प झाल्याने अवघ्या पाच दिवसांतच हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कालव्यात अडकलेल्या या व्यापारी जहाजाला घेऊन अनेक चर्चा होत आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. (Evergreen merchant ship stuck in Suez canal meme goes viral)
बाहुबलीला बोलवावं लागेल
जगातील सर्वांत व्यस्त असलेल्या सुएझ कालव्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने त्याची चर्चा शोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. कालव्यात रुतलेल्या जहाजाला बाहेर नेमकं कसं काढायचं यावर अनेक चर्चा सुरु आहेत. हे जहाज बाहेर काढण्यासाठी सोशल मीडियावर अनेक उपाय सांगितले जात आहेत. एका व्यक्तीने तर सुएझ कालव्यातील जहाज फक्त बाहूबली काढू शकतो, असं म्हणत एक मजेदार फोटो आपल्या ट्विटवर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्यक्तीने हा फोटो शेअर करताच त्याला अनेक लाईक्स मिळत आहेत. तसेच या फोटोला रिट्विटसुद्धा केले जात आहे.
Only man can help now is #Bahubali #SuezCrisis pic.twitter.com/8tgb1mkoFt
— Thummar Ankit ?? (@mathrunner7) March 28, 2021
सुएझ कालव्यात जहाज रुतल्यामुळे त्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तरीदेखील हे जहाज जागचे हललेले नाही. त्यामुळे एका मीमरने या जहाजाला फक्त गॉडजिलाच हलवू शकतो, असं मिश्किलपणे म्हणत एक फेटो शेअर केला आहे. तसेच हॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध अशा जॅक स्पॅरो या पात्राचा एक फोटो वापरुन ‘मी जहाज बाहेर काढायला तयार आहे. पण मी हे काम मोफत करणार नाही,’ असेसुद्धा एका नेटकऱ्याने मिश्किलपणे लिहले आहे.
We need Captain Jack Sparrow but his services will not be for free ??#suezcanel#SuezCrisis pic.twitter.com/VoDECMO4Od
— Muhammadlast1 (@muhammadlast1) March 28, 2021
सुएझ कालव्याईतकीच नेटकऱ्यांच्या या भन्नाट मीम्सची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या मीम्सना भरभरुन लाईक्स मिळत असून त्यांना चांगलीच पसंती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोर्तुगालची एक कंपनी समुद्रातील उंच लहरी आणि अन्य जहाजांच्या माध्यमातून सुएझ कालव्यात रुतलेले माकाय जहाज बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, अजूनही यश आलेले नाही.
इतर बातम्या :
Video | भूतानची छोटी मुलगी हात जोडून म्हणतेय Thank You भारत, व्हिडीओ बघून तुम्हीसुद्धा प्रेमात पडाल
(Evergreen merchant ship stuck in Suez canal meme goes viral)