Fact Check : ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ अंतर्गत 3500 रुपये मिळणार? वाचा व्हायरल पोस्टचं सत्य

| Updated on: May 21, 2021 | 5:28 PM

सोशल मीडियावर 'प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021' या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. चला तर पाहुयात या योजनेची सत्यता काय आहे?

Fact Check : प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021 अंतर्गत 3500 रुपये मिळणार? वाचा व्हायरल पोस्टचं सत्य
Pradhanmantri Berojgar Batta Yojna 2021
Follow us on

मुंबई : सध्या देशात एकिकडे कोरोनाचं थैमान सुरु आहे. दुसरीकडे या काळात लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हाताला काम नसल्याने आता दररोजच्या उपजीविकेचे प्रश्न तयार होत आहेत. त्यामुळे जो तो नोकरी शोधण्याचा किंवा आर्थिक आधार शोधण्याचा प्रयत्न करतोय. अशातच सोशल मीडियावर ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. यात देशातील 10 वी पास असलेल्या सर्व बेरोजगारांना दरमहिन्याला 3 हजार 500 रुपये देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आधीच अडचणीत आलेले अनेक लोक या मेसेजमधील वेबसाईटवर जाऊन आपली खासगी माहिती भरत आहेत (Fact Check on Pradhanmantri Berojgar Bhatta Yojana viral message on Social media).

व्हॉट्सअॅपवर हा मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. मात्र, हा मेसेज आणि ही योजन खरी की खोटी याचा यात विचार होताना दिसत नाहीये. चला तर पाहुयात या योजनेची सत्यता काय आहे?

व्हायरल मेसेजमधील योजना काय?

तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2021’ योजनेचा मेसेज आला असेल तर सावध व्हा. या मेसेजमध्ये बेरोजगारांना दरमहिन्याला 3 हजार 500 रुपये देण्यात येणार असल्याचा दावा केलाय. मात्र, हा लाभ घेण्यासाठी आधी नोंदणी करणं आवश्यक असल्याचं सांगितलंय. विशेष म्हणजे संबंधित योजनेचा लाभ मोफत मिळेल असं सांगत मेसेजमधील लिंकवर नोंदणी करण्यास सांगण्यात आलंय. या योजनेसाठी शिक्षणाची अट 10 वी पास आणि वयाची अट 18 ते 40 असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच नोंदणीसाठी शेवटची दिनांक 27 मे 2021 म्हटलीय. ही अंतिम मुदत दर काही दिवसांनी बदलवून वेगळी पुढील जवळची तारीख केली जाते.

व्हायरल पोस्टची सत्यता काय?

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (PIB) या व्हायरल पोस्टची दखल घेत केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केली नसल्याचं स्पष्ट केलंय. तसेच व्हायरल होत असलेला मेसेज खोटा (Fake Message) असल्याचं सांगितलं.

व्हायरल पोस्टचे बळी ठरल्यास काय नुकसान?

संबंधित व्हायरल मेसेजमध्ये सायबर गुन्हेगार लोकांना आपली खासगी/व्यक्तिगत माहिती देण्यास सांगतात. यात अगदी तुमच्या बँक खात्याचाही समावेश आहे. नागरिकांकडून बँकेच्या तपशीलासह इतर सर्व माहिती गोळा केल्यानंतर हे गुन्हेगार थेट बँक खात्यातील पैसे गायब करण्याचं काम करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या कोणत्याही मेसेजला बळी न पडणं हेच हिताचं आहे.

जबाबदार नागरिकांनी काय करावं?

जबाबदार नागरिकांनी सरकारी योजनांची सत्यता तपासल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नये. तसेच आपल्या संपर्कातील लोकांनाही जागृक करावं. महत्त्वाचं म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपवर आलेली माहिती आली की पुढे फॉरवर्ड करण्यापासून दूर राहिलं पाहिजे. एखादी गोष्ट आपण स्वतः खातरजमा केल्याशिवाय इतरांना पाठवू नये. अन्यथा तुम्ही स्वतः तर या फसवणुकीचे बळी ठरलाच पण तुमच्या जवळच्या इतर लोकांनाही या संकटात टाकाल. म्हणूनच सावध राहा, सतर्क राहा.

बनावट वेबसाईट कशा ओळखाव्यात?

अनेक सरकारी योजनांच्या मेसेजमध्ये खूप कुटिलपणे सरकारी वेबसाईटच्या नावांशी साधर्म्य असलेल्या वेबसाईट बनवल्या जातात. तसेच फोटो वापरले जातात. मात्र, थोडं बारकाईने पाहिलं तर या फसव्या वेबसाईट सहजपणे ओळखता येतात. सध्या भारतात प्रत्येक सरकारी अधिकृत वेबसाईटच्या शेवटी gov.in किंवा nic.in असा शेवट असतो. याशिवाय इंटरनेट सुरक्षिततेच्या नियमांप्रमाणे वेबसाईटची सुरुवात https:// अशी झाली आहे की नाही तेही तपासा? जर एखाद्या वेबसाईटमध्ये या दोन्ही किंवा यापैकी एकही गोष्ट नसेल तर सावध व्हा.

हेही वाचा :

सावधान, कोरोना काळात ‘हा’ एक SMS तुमचं बँक अकाऊंट रिकामं करु शकतो, SBI चा इशारा

Jio कडून 41 कोटी युजर्सला अलर्ट, मोफत मिळण्याच्या अमिषाने ‘ही’ चूक करु नका, नाहीतर मोठा भुर्दंड

Banking Fraud: 10 दिवसात बँकेच्या खात्यातून गायब झालेले पैसे मिळणार, वाचा RBI च्या सोप्या टीप्स

व्हिडीओ पाहा :

Fact Check on Pradhanmantri Berojgar Bhatta Yojana viral message on Social media