इस्लामाबाद : कोणत्याही व्यवसायाचा एक नियम आहे, जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर देणं, त्यांना आकर्षित करेल अशा अॅक्टिव्हिटी करणं, एका पाकिस्तानी कंपनीने अशीच एक भन्नाड कल्पमा मांडली आहे. कंपनीची ऑफर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या कंपनीने हेलिकॉप्टरद्वारे फुड डिलीव्हरी करण्याची घोषणा केली आहे. ‘हेलिकॉप्टरद्वारे फुड डिलीव्हरी’ ही कल्पना ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ही भन्नाट ऑफर. (famous Pakistani Pulao chain offering Food delivery by helicopter?)
साधारणपणे फुड डिलीव्हरी करणाऱ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यावर विशेष ऑफर्स, डिस्काऊंट देतात. किंवा एखादी गोष्ट विनामूल्य दिली जाते. परंतु पाकिस्तानमधील एका रेस्टॉरंटने एक आश्चर्यकारक ऑफर सादर केली आहे. या रेस्टॉरंटचे म्हणणे आहे की, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ग्राहकांपर्यंत जेवण पोहोचवले जाईल. तसेच कंपनीने म्हटलं आहे की, ही सुविधा फक्त इस्लामाबाद, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये दिली जाईल. या संदर्भात सोशल मीडियावर एक जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. फेसबुकवर Savor Foods या नावाने या ऑफरविषयी माहिती देण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, पुलाव आता हेलिकॉप्टरने तुमच्या घरी पोहोचेल. ही जाहिरात पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
ही जाहिरात पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल ना, परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अशी कोणतीही ऑफर अस्तित्वात नाही. कारण या जाहिरातीमधील # (हॅशटॅग) नीट पाहा. कंपनीने जाहिरात पोस्ट करताना सोबत #mazakkarrayhain (मजाक कर रहे हैं) असा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे स्पष्ट होतंय की, कंपनीने ही पोस्ट गंमत म्हणून केली आहे. कंपनीने ही जाहिरात काल (1 एप्रिल) लोकांना एप्रिल फुल करण्यासाठी केली आहे, हे स्पष्ट होतंय. 4 हजार 700 हून अधिक लोकांना ही पोस्ट आवडली आहे. 1300 हून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केली आहे. तर 600 हून अधिक लोकांनी ही जाहिरात शेअर केली आहे.
इतर बातम्या
April Fools Day 2021 : केवळ ‘फूल’ डे नाही तर या खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे ‘1 एप्रिल’
Video | समुद्रात जाऊन तरुणांची मस्ती, मुंबई पोलिसांनी थेट कोंबडा होऊन पळायला लावलं, व्हिडीओ व्हायरल
प्रेमासाठी मुलाने चक्क तोडून आणला चंद्राचा तुकडा, Viral Video पाहून तुम्ही पोट धरून हसाल…
(famous Pakistani Pulao chain offering Food delivery by helicopter?)