Viral News : सासरवाडीच्या लोकांनी जावयाला शिक्षण दिलं आणि शिपाई केलं, नोकरी लागताच दुसऱ्या लग्नाच्या धमक्या देऊ लागला, मग…

| Updated on: Apr 16, 2023 | 9:36 AM

Bihar News : हे प्रकरण बिहार राज्यातील नाथनगरमधील आहे. एका महिलेने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे.

Viral News : सासरवाडीच्या लोकांनी जावयाला शिक्षण दिलं आणि शिपाई केलं, नोकरी लागताच दुसऱ्या लग्नाच्या धमक्या देऊ लागला, मग...
Bihar News
Image Credit source: tv9marathi
Follow us on

भागलपूर : जिल्ह्यातील नाथनगरमधील (Nathnagar) हे प्रकरण आहे. तिथल्या एका महिलेने आपल्या पती विरोधात पोलिस स्टेशनमध्ये (bihar police) तक्रार दाखल केली आहे. त्या महिलेचं नाव चंद्रकला देवी असं आहे. २०१३ मध्ये त्या महिलेचं लग्न कम्पनीबाग येथील गोपाल कुमार मंडल यांच्यासोबत झालं होतं. त्या महिलेच्या नवऱ्याची अर्थिकस्थिती योग्य नसल्यामुळे तो सासरवाडीच्या लोकांसोबत राहत होता. त्यावेळी सासऱ्याने पैसे खर्च करुन जावयाला शिकवले. त्यानंतर जावयाला बिहारच्या पोलिस दलात (in the Bihar Police Force) नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर जावयाने सासुरवाडीला येणं बंद केलं. त्याचबरोबर दुसरं लग्न करण्याची धमकी दिली असा आरोप पत्नीने पतीवरती केला आहे.

लग्नानंतर सगळं ठीक चाललं होतं

पीडित महिला चंद्रकला देवीने सांगितले की, माझं लग्न 2013 मध्ये झालं होतं. ज्यावेळी माझ्या पतीला नोकरी लागली, त्यानंतर माझ्या नवऱ्यात प्रचंड बदल झाला आहे. त्याने सासुरवाडीला जाणं बंद केलं आहे. त्याचबरोबर आता माझ्या कोणत्याही गोष्टीचा विचार केला जात नाही. काही दिवसांनी पत्नीला समजलं की, पत्नी दोन मुलांच्या आईच्या प्रेमात पडला आहे. पत्नीशी खोटं बोलून तो त्या महिलेला भेटायला जात आहे. त्यानंतर विरोध केल्यानंतर मारहाण करीत आहे अशा पद्धतीची तक्रार पोलिस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.

पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत

पीडित महिलेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचा जावाई अगदी गरीब होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं. मी त्यांच्यावर स्वत:चे पैसे खर्च करुन त्याला शिकवलं आणि पोलिस दलात भर्ती केलं आहे. त्याची भरती झाल्यापासून तो चुकीचं वागत आहे. शिवराळ भाषा वापरत असून घाणेरड वागत आहे. आम्हाला न्याय हवा असल्याने आम्ही पोलिस अधीक्षक यांच्याकडे आलो असल्याचे सासऱ्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक आनंद कुमार यांनी सांगितलं की 2019 मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं होतं. सध्या त्या पोलिस कर्मचाऱ्यावरती लवकरचं कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.

हे सुद्धा वाचा