महिला पोलिसाचा ‘हा’ डान्स बघाल तर नोरा फतेहीला देखील विसराल, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Feb 07, 2024 | 12:22 PM

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस डान्स करताना दिसत आहे. मुघल-ए-आझम या चित्रपटातील 'किसी दिन मुस्कुरा कर ये नजरा हम भी देखेंगे' या गाण्यावर ती नृत्य करतानाचा हा व्हिडीओ आहे.

महिला पोलिसाचा हा डान्स बघाल तर नोरा फतेहीला देखील विसराल, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Follow us on

Female Cop Viral Dance Video : सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात.काही हसवणारे, काही थरारक तर काही एकदम मजेशीर व्हिडीओ असतात. काही व्हिडीओंमध्ये तर लोक अनेक प्रकारे नाचताना दिसतात. काही डान्स तर व्हिडिओ असे असतात , जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.सध्या असाच एक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या डान्समुळे सोशल मीडियावर सगळेच तिचे चाहते झाले आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्या डान्समधील तिच्या स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. तिचा डान्स एवढा जबरदस्त आहे की ,तिने उत्तम डान्स असलेली अभिनेत्री नोरा फतेही हिलादेखील टक्कर देत आहे.

महिला पोलीसने केला जबरदस्त डान्स

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला पोलिस पोलिसांच्या गणवेशात नाचताना दिसत आहे. मुघल-ए-आझम या चित्रपटातील ‘किसी दिन मुस्कुरा कर ये नजारा हम भी देखेंगे’ या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर तिने उत्तम एक्स्प्रेशन्स देत चांगला डान्स केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून लोकांनाही खूप आवडला आहे. @shiya_thakur_si नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तीस हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

 

 

लोकांनी केल्या कमेंट्स

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ‘देश धोक्यात आहे’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘लवकरच कारवाई केली जाईल, आम्ही माहिती काढत आहोत.’ आणखी एका यूजरने तिच्या गमवेशाबद्दल कमेंट केली. तर चौथ्या युजरने कमेंट करत लिहिले, ‘मॅम, तुम्ही आमच्या जागेवर रेड मारण्यास कधी येत आहात?’, अशा प्रकारच्या वेगवगळ्या प्रतिक्रिया युजर्शनी या व्हिडीओवर केल्या आहेत.