बेल्लारी : जंगलात अनेक प्रकारचे प्राणी (Animals) असतात. त्यांच्यातल्या झुंजी आपण नेहमीच पाहतो. कधी शिकार हिसकावण्यावरून किंवा कधी एकमेकांच्या प्रदेशात घुसखोरी केली म्हणून हे प्राणी एकमेकांवर चवताळतात. त्यांच्याच मग लढाया होतात. काही लढाया तर अक्षरश: जीवघेण्या असतात. एकमेकांचे लचके तोडले जातात. आपण सोशल मीडिया(Social Media)वर असे अनेक व्हिडिओ (Video) पाहत असतो. त्याच प्रकारातला एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये आपल्याला कुत्रा (Dog) आणि साप (Snake) यांच्यातलं युद्ध दिसून येईल.
कुत्र्यांची दादागिरी
कुत्रा हा तसा पाळीव प्राणी. मालकाशी प्रामाणिक. मात्र जंगलात जर तो असेल तर एक आक्रमक प्राणी म्हणूनच ओळखला जातो. स्वत:ची शिकार कशी मिळवायची, हे कुत्र्याला चांगलं समजतं. कुत्रे हे बऱ्याचवेळा एकत्र, समुहानं असल्यानं इतर प्राणी त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहू शकत नाहीत. मग अशावेळी कुत्र्यांची दादागिरी पाहायला मिळते. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओतही तेच दिसून येतंय.
भलामोठा साप फणा काढलेल्या अवस्थेत
बेल्लारीतल्या या व्हिडिओत तीन कुत्री तुम्हाला दिसतील. ही कुत्री एकमेकांशी नव्हे तर चक्क सापाशी भांडतायत. हा व्हिडिओ कोण्यातरी शेतातला दिसतो. याठिकाणी भलामोठा साप फणा काढलेल्या अवस्थेत आपल्याला दिसतोय. याच सापाशी झुंज करतायत तीन कुत्रे. या कुत्र्यांनी सापाला घेरलं असून ते त्याच्यावर भुंकत आहेत. एक पुढच्या दिशेनं असून एक मागच्या व बाजुच्या दिशेनं या सापावर हल्ला करतायत. सापही न घाबरता त्यांचा सामना करतो. व्हायरल व्हिडिओ जवळपास दोन मिनिटं आहे.
भांडण मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद
तीन कुत्रे आणि कोब्रा साप यांच्यातलं हे भांडण मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद झालंय. बेल्लारी जिल्ह्यातल्या सिरगुप्पा तालुक्यातल्या बालकुंडी गावाजवळ कोब्रा या विषारी सापावर तीन कुत्र्यांनी हा हल्ला केलाय. हा कोब्रा या तीन कुत्र्यांपासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.