उत्तर प्रदेश : भारतात (India) काही लोकं प्राण्यांच्यावरती (Pet Animal) इतकं प्रेम करतात की, त्यांना जीवापाड जपतात. घरातला सदस्य असल्यासारखे त्याची काळजी घेतात. काहीजण घरातला एक विरंगुळा म्हणून त्यांच्याकडे पाहतात. सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये कुत्र्यासारखे अनेक प्राण्यांचे व्हिडीओ आहेत. उत्तर प्रदेशमध्ये (UP) एक कुत्रा (Dog) हरवला आहे. त्याला जो शोधून देईल त्याला दहा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे.
संगम नगरी प्रयागराज मधील फिरोज परिसरातील मोमो नावाचा कुत्रा मागच्या काही दिवसांपासून गायब झाला आहे. ज्या कुत्र्याला युवतीनं पाळलं होतं. ती मागच्या काही दिवसांपासून परेशान आहे. तिने ती राहत असलेल्या परिसरात कुत्र्याचा फोटो लावला आहे. तसेच त्या बॅनरवरती कुत्र्याला शोधून देणाऱ्या इसमाला दहा हजार रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.
विदेशी कुत्री अनेकजण पाळत आहेत. परंतु देशी कुत्री आता कोणी पाळताना दिसत नाही. तरुणीने एका देशी कुत्र्याचं पालण केलं होतं. ते अचानक गायब झाल्याने तरुणी अस्वस्थ आहे. तो कुत्रा मागच्या अडीच वर्षापासून तरुणीच्यासोबत आहे.
याच्या आगोदर सुध्दा तिथून एक देशी कुत्रा गायब झाला होता. त्यावेळी सुध्दा मालकाने शोधून देईल त्याला 5 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं होतं.
त्याचं परिसरातून मांजर गायब झालं होतं. त्यावेळी सुध्दा मांजराच्या मालकाने शोधून देणाऱ्या इसमाला दहा रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु काही दिवसांनी मांजर परत आल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.