मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल आणि कधी कोणती गोष्ट ट्रेंड करेल सांगता येत नाही. सध्या एका डान्सच्या व्हीडिओने अनेकांची मनं जिंकली आहेत. पॅरिसमधल्या एका डान्सरचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या डान्सरचं नाव जिका असं आहे. यात तो लेझी लॅड या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. यात त्याच्यासोबत आणखी एक तरूण दिसत आहे.
पॅरिसमधल्या एका डान्सरचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डान्सरचं नाव जिका असं आहे. यात तो लेझी लॅड या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. यात त्याच्यासोबत आणखी एक तरूण दिसत आहे. हा व्हीडिओ जिकाच्या इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय. आणि बारा हजारांहून अधिकांनी लाईक केलंय.
जिका त्याच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. याआधीही त्याच्या डान्सचे व्हीडिओ चर्चेचा विषय ठरले होते. तो भारतीय डान्स प्रकार भरतनाट्यम करताना पाहायला मिळाला. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने भरतनाट्यमचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत jika पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करतोय. त्यावरव त्याने चष्माही घातला आहे.त्याच्या या व्हीडिओत त्याचे दोन मित्रही त्याच्यासोबत पाहायला मिळत आहेत. एक मुलगी आणि दोन मुलं अश्या या तिघांचा डान्स तुफान व्हायरल होत आहे.
जिका भारतीय गाण्यांवर रील्स बनवत असतो. त्याचा सामी-सामी गाण्यावरचा डान्सही काही दिवसांआधी व्हायरल झाला होता. पॅरिसमधल्या एका डान्सरचा पुष्पामधल्या सामी सामी गाण्यावरचा व्हीडिओ व्हायरल झाला. पॅरिसमधल्या Jika या डान्सरने सामी सामीवरचा डान्सचा व्हीडिओ शेअर केलाय. या व्हीडिओत jika केसरी रंगाच्या टी-शर्टमध्ये डान्स करतोय.तितक्यात त्याला आणखी एक जण जॉइन करतो, दोघेजण मिळून जोरदार डान्स करतात. मग तो एका गार्डनमध्ये डान्स करू लागतो. मग त्याला जोकरचा मुखवटा घातलेला एकजण जॉइन करतो आणि दोघेजण मिळून या गाण्यावर तुफान डान्स करतात.
संबंधित बातम्या