Perfume Day 2023 : शुक्रवारी ‘परफ्यूम डे’ आहे, काय असते या दिवसाचे प्रयोजन

| Updated on: Feb 16, 2023 | 6:05 PM

14 फेब्रुवारीच्या व्हेलेंटाईन दिवसापूर्वी आठवडाभर व्हेलेंटाईन सप्ताह साजरा केला जातो. तसा आता एण्टी व्हेलेंटाईन सप्ताह साजरा केला जात आहे. उद्या परफ्युम डे साजरा केला जात आहे.

Perfume Day 2023 : शुक्रवारी परफ्यूम डे आहे, काय असते या दिवसाचे प्रयोजन
perfume
Image Credit source: socialmedia
Follow us on

Perfume Day 2023 : व्हेलेंटाईन सप्ताह संपल्यानंतर 15 तारखेपासून आता अॅण्टी व्हेलेंटाईन सप्ताह सुरू झाला आहे. या एण्टी   व्हेलेंटाईन ( Anti-Valentine’s Week  ) सप्ताहात एकटे रहाणाऱ्यासाठी आता विविध दिवसांचे आयोजन केलेले असते. स्वत:वर प्रेम करण्यासाठी हे दिवस साजरे केले जात आहेत. त्यात आता उद्या शुक्रवारी परफ्युम साजरा केला जाणार आहे. या संपूर्ण अॅण्टी व्हेलेंटाईन सप्ताहात कोण, कोणते दिवस साजरे केले जाणार आहेत हे पाहूया..

14 फेब्रुवारीला जगभरात प्रेमाचा दिवस जगभरातील प्रेमींनी साजरा केला. 14 फेब्रुवारीच्या व्हेलेंटाईन दिवसापूर्वी आठवडाभर व्हेलेंटाईन सप्ताह साजरा केला जातो. तसा आता एण्टी व्हेलेंटाईन सप्ताह साजरा केला जात आहे. व्हेलेंटाईन डे संपल्याच्या दुसऱ्या दिवसांपासूनच  एण्टी व्हेलेंटाईन सप्ताह सुरू झाला आहे. 15  ते 21 फेब्रुवारी पर्यंत ज्यांना व्हेलेंटाईन डे आवडत नाही किंवा जे अजूनही सिंगल आहेत, ते आता हा एण्टी व्हेलेंटाईन सप्ताह साजरा करीत आहेत.

14 फेब्रुवारीनंतर सुरू होणाऱ्या एण्टी व्हेलेंटाईन सप्ताहा मध्ये पहिला दिवस 15 फेब्रुवारी स्लॅप डे, नंतर किक डे, परफ्युम डे, फ्लर्ट डे, कन्फेशन डे, मिसिंग डे आणि ब्रेक डे साजरे केले जातात. आपल्याला जीवन आनंदाने जगण्यासाठी एखाद्या स्पेशल व्यक्तीची गरजच नाही असे मानणाऱ्या सिंगल लोकांसाठीचे हे दिवस आहेत.

17  फेब्रुवारी दरवर्षी ‘परफ्यूम डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसात तु्म्ही खरेदीसाठी बाहेर पडत स्वत: साठी परफ्यूम खरेदी करू शकता. तुम्ही स्वत: ला आनंदी ठेवण्यासाठी आवडत्या परफ्यूमची खरेदी करीत हा दिवस साजरा करावा असा उद्देश्य या मागे आहे. परफ्युमच्या पाच प्रकारातून तुम्ही आवडत्या प्रकारचा परफ्युम निवड शकता. फुलांचा अर्क वा इसेंस किंवा एक्सट्रॅक्ट 15 ते 30 टक्के आणि अल्कोहॉल अशा मिश्रणास परफ्युम म्हणतात. सुगंधी घटकाचे तेलातील प्रमाणावर त्याचे विविध पाच प्रकार आहेत. परफ्यूम,Eau de parfum, Eau de toilette, परफ्युम कलोन, परफ्युम डिओडंड असे प्रकार आहेत. परफ्युम कपड्यांवर ते थेट वापरता येत नाहीत. कारण त्याने डाग पडू शकतात. म्हणूनच ते मान, कान, मनगटाच्या त्वचेवर लावले जातात.