दैनंदिन जीवनात सोशल मीडियाचे महत्त्व इतके अनन्यसाधारण झाले आहे की काही काळ जरी सोशल मीडियातील एखादे प्लॅटफॉर्म बंद असले तरी लोक अस्वस्थ होतात. इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या बाबतीत प्रचंड लोकप्रियता आहे. अगदी सामान्य व्यक्तीपासून ते नेतेमंडळींपर्यंत सगळेच या माध्यमांवर सक्रिय असतात. मध्येच काही तांत्रिक कारणास्तव या प्लॅटफॉर्म्सचे कामकाज ठप्प पडले की, त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या असतात. अशाच प्रकारे इंस्टाग्राम काही काळ डाऊन झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियांचा सोशल मीडियात जणू पाऊसच पडला आहे.
अनेकांनी ट्विटरवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या भावना व्यक्त करण्यासाठी शेअर करण्यात आलेल्या विनोदी मीम्स चर्चेचा विषय बनल्या आहेत. आता याची तक्रार कुठे करायची, असा मार्मिक सवालही काही युजर्सनी इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर उपस्थित केला आहे.
All of us coming to twitter to confirm instagram is down #instagramdown pic.twitter.com/DT6BthlNDK
— cesar (@jebaiting) October 31, 2022
कोट्यवधी यूजर्सना फटका
ट्विटरप्रमाणेच इंस्टाग्राम हे अत्यंत लोकप्रिय असे सोशल मीडियातील प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. विशेषतः इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओज पोस्ट केले जातात. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म काही काळ बंद झाले तर काय गोंधळ उडू शकतो, याचा प्रत्यय आता आला आहे.
#instagramdown again. The only ones who never disappoint me pic.twitter.com/yeWxZurwvn
— Mr bean (@thisbeann) October 31, 2022
इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियातील कोट्यवधी युजर्सना फटका बसला आहे. अनेकांना प्लॅटफॉर्म स्क्रोल करताना अडचण येत आहे, त्याचबरोबर अनेकांचे अकाउंट लॉक झाले. अशा विविध प्रकारच्या अडचणींना तोंड देताना instagram चे युजर्स बेहाल झाले आहेत.
इंस्टाग्राम डाऊन झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी ट्विटरकडे मोर्चा वळवला आहे. ट्विटरवर ‘#इंस्टाग्राम डाऊन’ टॉप ट्रेंड करतोय. युजर्स याच हॅशटॅगसोबत आपल्या रंजक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. हजारो लोकांनी शेअर केलेला मीम्स तर प्रचंड करमणूक करत आहेत.
आता तक्रार कुणाकडे करायची? असा प्रश्न देखील अनेकांनी केला आहे. इंस्टाग्राम डाऊन असेपर्यंत ट्विटरवरील ह्या प्रतिक्रिया वाचण्याचा आनंद सोशल मीडियातील युजर्स लुटत आहेत.