मुंबई : सध्याचं युग हे समाजमाध्यमांचं युग आहे. सोशल मीडियाच्या जोरावर एका क्षणामध्ये अनेकजण सेलिब्रिटी झाले आहेत. प्रसिद्धी मिळावी म्हणून प्रँकच्या मदतीने अनेकजण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून समोर आले आहेत. प्रसिद्ध शेफ गॉर्ड रॉमसे हेसुद्धा प्रँकचे शिकार झाले आहेत. त्यांच्या मुलीमुळे त्यांची चांगलीच फसगत झाली आहे. (funny prank video of chef Gordon Ramsay goes viral)
गॉर्डन रॉमसे हे जगप्रसिद्द शेफ आहेत. पाककलेचे त्यांचे अनेक टिव्ही शोज तुम्ही पाहिले असतील. त्यांच्याच मुलीने रॉमसे यांच्यासोबत एज जबरदस्त प्रँक केला आहे. या प्रँकचा व्हिडीओ रॉमसे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताच, रॉमसे यांची झालेली फजिती पाहून सगळ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रॉमसे यांच्या मुलीने त्यांच्यासोबत चांगलाच प्रँक केला आहे. बॉटलमध्ये कोबंडीचे अंडे टाकण्याच्या बाहाण्याने रॉमसे यांची मुलगी टिली रॉमसे हिने चांगलाच कारनामा केलाय. तिच्या हातात एक कोंबडीचे अंडे आहे. त्या अंड्याला घेऊन जादू दाखवण्याचा बहाणा करत ती रॉमसे यांना बॉटलजवळ बोलावते. रॉमसे यांनी बॉटलजवळ तोंड नेताच, त्यांच्या मुलीने बॉटल खालून जोराद दाबलीये. त्यानंतर चेहऱ्यावर पाणी पडल्यानंतर रॉमसे चांगलेच गोंधळले. त्यानंतर लगेच मुलीने दुसऱ्या हातातील अंडे रॉमसे यांच्या चक्क डोक्यावर फोडले. या प्रकारानंतर मात्र रॉमसे यांची चांगलीच धांदल उडालीये. नेमकं काय करावं हे त्यांना समजत नाहीये.
दरम्यान, हा प्रँक झाल्यानंतर रॉमसे यांनी स्वत:हून हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर टाकला. त्यानंतर हा प्रँक बघून जगभरात अनेक प्रतिक्रिया आल्या. रॉमसे यांच्या फजीतीमुळे अनेकजणांना हसू आवरले नाही. सोशल मीडियावर अपलोड करताच, हा व्हीडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
इतर बातम्या :
VIDEO | वॉटर सफारीची मजा लुटणारा प्राणी, मनमोहक व्हिडीओने लक्ष वेधलं
VIDEO : मलायकाचा जबरदस्त डान्स, हजारो चाहत्यांकडून दाद
Video | कोरोना लस घेतल्यानंतर आनंद कसा होतो पाहायचंय?, मग हा मजेदार व्हिडीओ नक्की पाहा
(funny prank video of chef Gordon Ramsay goes viral)