नवी दिल्ली : सध्या एका दारुच्या पार्टीतील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. त्याला कारण तसच घडलं आहे. मात्र दारुची पार्टी झाल्यानंतर मात्र पार्टी करणाऱ्यांनाही आणि देणाऱ्यांनाही एक प्रकारची अद्दलच घडली आहे. नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.यामध्ये दारुची जोरदार पार्टी सुरू आहे. त्यामध्ये लोकं पार्टीचा आनंद लुटत आहेत. तर त्याचवेळी अनाचक रामानंद सागर यांनी साकारलेल्या रामायणातील काही दृश्ये स्क्रीनवर दिसू लागली आहेत आणि ते बघून बारमधील काही लोकं दारू पिऊन नाचू लागली आहेत.
या व्हिडिओ राम आणि रावण यांच्यामध्ये रणांगणावरचा संवाद सुरू आहे. तर बारमध्ये उपस्थित लोक दारूचे ग्लास घेऊन जोर जोरात ओरडत आहेत.
नेमका हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे. गौतम बुद्ध नगर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर-39 पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अनेक हिंदू संघटनांनी पोलिसांकडे तक्रार केली असून डीजे ऑपरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी एका तरुणालाही अटक केली आहे.
या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना बारमध्ये काम करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, पार्टीदरम्यान चुकून रामायणाचा व्हिडिओ लागला, आणि नेमका बारमधील तोच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी अतिरिक्त डीसीपी नोएडा शक्ती अवस्थी यांनी सांगितले की, हे सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे गार्डन गॅलेरिया मॉलच्या लॉर्ड्स ऑफ ड्रिंक्स बारबद्दल बोलले जात आहे.
या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध मालिका रामायण मालिकेतील काही पात्रांचा व्हिडिओ केला आहे तर त्यामध्ये काही जण डान्स करत आहेत. याची दखल घेत सेक्टर 39 च्या पोलिसांनी तत्काळ एफआयआर नोंदवला असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.