Gautam Adani ने शेअर केलेला हा VIDEO बघायला हिम्मत हवी, तुम्ही पण सॅल्युट कराल

| Updated on: Mar 27, 2025 | 2:52 PM

गौतम अदानी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील व्यक्ती गेली कित्येक वर्ष व्हिलचेअरवर आहे. या व्यक्तीची बंजी जंपिंगची इच्छा पूर्ण झाली आहे. त्याचा व्हिडीओ शेअर करत, 'कोणतीही भीती इच्छाशक्तीला रोखू शकत नाही' असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Gautam Adani ने शेअर केलेला हा VIDEO बघायला हिम्मत हवी, तुम्ही पण सॅल्युट कराल
Adani Video
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

एखादी गोष्ट करण्याची तुमची मनापासून इच्छा असेल तर ती गोष्ट करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. असेच काहीसे अदानी ग्रुपच्या एका कर्मचाऱ्याने केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा कर्मचारी व्हिलचेअरवर आहे. या कर्मचाऱ्याने बंजी जंपिंग करुन सर्वांना चकीत केले आहे. त्याच्या या धाडसी कृत्याची सर्वत्र चर्चा होत आहे. खुद्द गौतम अदानी यांनीही या कार्मचाऱ्याचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याला अनेकांसाठी प्रेरणास्थान असेही म्हटले आहे.

व्हिलचेअरव बसलेल्या व्यक्तीचा बंजी जंपिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव के मेहता असे आहे. ते अदानी ग्रुपमध्ये काम करतात. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून ते व्हिलचेअरवर आहेत. बंजी जंपिंग करण्यासाठी धाडस लागते. अनेकजण करताना विचार करतात. मात्र, मेहता यांनी व्हिलचेअरवर असूनही बंजी जंपिंग करण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओमध्ये ते आनंदाने बंजी जंपिंग करताना दिसत आहेत.

गौतम अदानी यांनी कौतुक केले

हृषिकेशच्या प्रसिद्ध बंजी जंपिंग पॉइंटवरून मेहता यांनी ही बंजी जंपिंग केली आहे. अनेक फूट उंचीवरून त्यांनी उडी मारण्याचा रोमांचक स्टंट केला आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांनी व्हिलचेअरवरून उडी मारताच तेथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटले. लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांचा उत्साह आणखी वाढला. मेहता यांचा हा बंजी जंपिंग करतानाचा व्हिडीओ गौतम अदानी यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, “बहुतेक लोक हे थ्रिलसाठी करतात. आमचे स्वतःचे अदानी कर्मचारी मेहता यांनी हृषिकेश येथील उंचीवरून एक अशी झेप घेतली ज्याने जगाला दाखवून दिले की कोणताही अडथळा, कोणतीही भीती इच्छाशक्तीला थांबवू शकत नाही. तुम्ही आम्हाला केवळ प्रेरणा देत नाही, तर तुम्ही अदानी असणे म्हणजे काय हे पुन्हा परिभाषित केले आहे. आपण नेहमीच करुन दाखवतो” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला

गौतम अदानींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून हजारो लोकांनी तो पाहिला आणि लाईक केला आहे. यानंतर यूजर्सनी के मेहता यांची प्रशंसा केली आहे. यावर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आम्ही अदानी ग्रुप बोलण्यापेक्षा करून दाखवतो.’ तर दुसऱ्या एका यूजरने, ‘बंजी जंपिंग हे इतके धाडसी काम आहे, व्हील चेअरवर बसून ते करणे खूप कठीण आहे’ अशी कमेंट केली आहे.,