आईपणाचं उदात्तीकरण म्हणजे महिलांचा छळ? महिला अधिकाऱ्याकडून टॉयलेटमधला फोटो शेअर, नव्या वादाला तोंड, वाचा सविस्तर

| Updated on: Mar 04, 2021 | 1:49 PM

त्या बाथरूमच्या कमोडवर बसल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडा ठेवला आहे. सिंगल पॅरेंट असल्यामुळे गीता यांना आपल्या लहान मुलाची सतत काळजी घ्यावी लागते. | Geeta yatharth bathroom pic

आईपणाचं उदात्तीकरण म्हणजे महिलांचा छळ? महिला अधिकाऱ्याकडून टॉयलेटमधला फोटो शेअर, नव्या वादाला तोंड, वाचा सविस्तर
सिंगल पॅरेंट असल्यामुळे गीता यांना आपल्या लहान मुलाची सतत काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गीता यांना अगदी बाथरुमला जातानाही मुलाला एकटे सोडता येत नाही.
Follow us on

मुंबई: सोशल मीडियावर दररोज विविध कारणांवरून वाद-प्रतिवाद सुरु असतात. सध्यादेखील सोशल मीडियावर एका महिलेल्या फोटोवरुन मोठा वाद रंगला आहे. या महिलेने बाथरूममध्ये (Bathroompic) कमोडवर बसलेला आपला फोटो शेअर केला होता. त्यानंतर फेसबुकसह सोशल मीडियावर संस्कृतीरक्षक विरुद्ध उदारमतवादी असा वाद रंगला आहे. हे आईपणाचं उदात्तीकरण आहे की खरंच महिलांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, याविषयी विविध मुद्दे मांडले जात आहेत. (women sitting on commode going viral on social media)

काही दिवसांपूर्वी भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असणाऱ्या गीता यथार्थ यांनी फेसबुकवर स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्या बाथरूमच्या कमोडवर बसल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडा ठेवला आहे. सिंगल पॅरेंट असल्यामुळे गीता यांना आपल्या लहान मुलाची सतत काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गीता यांना अगदी बाथरुमला जातानाही मुलाला एकटे सोडता येत नाही. त्यामुळेच आपण बाथरुमला जाताना दरवाजा बंद करत नाही, असे गीता यथार्थ यांनी सोशल मीडियावर सांगितले होते.

गीता यथार्थ यांनी सिंगल पॅरेटिंगमधील आव्हानं काय असतात, हे समजण्याच्या उद्देशाने हा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. मात्र, त्यावरून काही स्वयंघोषित संस्कृती रक्षकांनी गीता यथार्थ यांना ट्रोल करायला सुरुवात केले. हा फोटो म्हणजे अश्लिलता असल्याचे या संस्कृती रक्षकांचे म्हणणे आहे. हे तर काय सगळेच करतात, पुरुषांनाही मूल सांभाळताना हे करावंच लागतं, यात असा सनसनाटी फोटो टाकण्याची काय गरज, अशा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.

वॉशरूम का लास्ट टाइम गेट कब क्लोज किया था, याद नहीं.
अब तो हालात ये है कि ऑफिस में भी, टॉयलेट का दरवाजा बंद करना याद…

Posted by Geeta Yatharth on Tuesday, 2 March 2021

 

तर दुसरीकडे अनेकजणांनी गीता यथार्थ यांचे समर्थन करत स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना फटकारले आहे. या फोटोमध्ये कोणतीही अश्लिलता नाही. फक्त एक दिवस पूर्णवेळ लहान मुलाला सांभाळून दाखवा. जेणेकरून एका आईला काय करावे लागते, हे तुम्हाला समजेल. या सगळ्या वादामुळे सध्या सोशल मीडियावर गीता यथार्थ हे नाव प्रचंड चर्चेत आहे.

इतर बातम्या:

1800 कोटींची लॉटरी जिंकून एक दमडीही मिळाली नाही, नशीबाने ‘असा’ दिला धोका

VIDEO : अभिनेत्री रकुलप्रीत सिंहचा ‘पावरी’ स्टाईल योगा, चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

ऐकावं ते नवलंच… डोनाल्ड ट्रम्प यांचा 10 सेकंदाचा खास व्हिडीओ तब्बल 48 कोटींमध्ये विकला

(women sitting on commode going viral on social media)