VIDEO | जर्मन महिलेने तिच्या भारतीय नवऱ्यासाठी बनवला देशी टिफिन

| Updated on: Sep 06, 2023 | 11:24 AM

German woman makes desi lunch : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जर्मन महिलेचं आपल्या नवऱ्यावरती किती प्रेम आहे हे पाहायला मिळत आहे. ती महिला आपल्या पतीला भारतीय पद्धतीचं जेवण तयार करुन देत आहे.

VIDEO | जर्मन महिलेने तिच्या भारतीय नवऱ्यासाठी बनवला देशी टिफिन
German woman makes desi lunch for Indian husband
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (German woman makes desi lunch) अधिक व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की, लोकांनी त्या परेदशी महिलेचं (German woman) कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर एखादी गोष्ट हटके असेल तरचं शेअर होते. सध्याची गोष्ट सुध्दा त्याच पद्धतीची आहे. जर्मनची महिला तिच्या भारतीय पतीवर मनापासून प्रेम करते. त्यांनी लग्न केलं आहे. दोघेही जर्मन देशात वास्तव करीत आहेत. त्यांना दोन मुली सुध्दा आहेत. विशेष म्हणजे जर्मनची तरुणी आपल्या नवऱ्यासाठी भारतीय पद्धतीचं जेवण तयार करीत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया (viral news in marathi) प्रचंड व्हायरल झाला आहे.

मोंटी असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. तो पंजाब राज्यातील अमरीतसर येथील मुळचा रहिवासी आहे. त्याच्यासाठी त्यांची पत्नी अड्रेया यांनी भारतीय पद्धतीचं जेवणं तयार केलं आहे. त्यांनी जेवणासाठी काळ्या हरभऱ्याची भाजी आणि रोटी सुध्दा तयार केली आहे.

हे सुद्धा वाचा

अड्रेया यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एकदम गोलाकार रोटी त्यांनी तयार केली आहे. त्याचबरोबर भारतीय पद्धतीने हरभऱ्याची भाजी तयार केली आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यामध्ये भारतीय पद्धतीचे सगळे मसाले वापरले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ज्या लोकांनी पाहिला आहे. त्यांनी कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अड्रेया यांनी म्हटलं आहे की, माझा नवरा भारतीय आहे. त्याचबरोबर तो पंजाब राज्यातील अमरीतसर येथील आहे. मी त्याच्यासाठी भारतीय पद्धतीचं जेवण तयार करायला शिकले आहे. त्याचबरोबर मी खूप लकी आहे, की त्याच्यामुळे मला हे सगळं शिकायला मिळालं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये त्या कशापद्धतीने हरभऱ्याची भाजी तयार करीत आहेत, ते पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर रोटी सुध्दा कशा पद्धतीने तयार केली आहे. ते सुद्धा त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दाखवले आहे. तयार केलेला डब्बा त्यांनी आपल्या पतीला दिला आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता आहे.