Wild animals video : तुम्ही साप (Snake) पाहिले असतील. ते विशेषतः ग्रामीण भागामध्ये तसेच जंगल परिसरात ते वारंवार पाहिले जाणारे प्राणी आहेत. आयर्लंड, आइसलँड, न्यूझीलंड, उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे एकमेव क्षेत्र आहेत जेथे साप आढळत नाहीत. याशिवाय हा सरपटणारा प्राणी जगभर आढळतो. जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत, परंतु त्यापैकी फक्त काही साप आहेत, जे अतिशय धोकादायक आणि विषारी आहेत. किंग कोब्रा, क्रेट, रसेल वायपर इत्यादी जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहेत. त्याचबरोबर अजगर आणि अॅनाकोंडा (Anaconda) यांची गणना धोकादायक (Dangerous) सापांमध्ये केली जाते. अॅनाकोंडा अजगरापेक्षा खूप मोठे असतात. हे पृथ्वीवरील सर्वात मोठे आणि वजनदार साप आहेत. ते 30 फूट लांब असू शकतात. अॅनाकोंडा सहजासहजी दिसत नसला तरी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महाकाय अॅनाकोंडा पाण्यात तरंगताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की काही लोक जंगलाच्या मध्यभागी बोटिंग करत आहेत, तेव्हाच त्यांचा सामना एका महाकाय अॅनाकोंडाशी होतो, जो पाहून बोटीवर बसलेले लोक किंचाळतात. खरे तर, हा अॅनाकोंडा इतका प्रचंड आहे, की त्याला पाहून कोणीही ओरडू शकेल. त्या अॅनाकोंडाला पाहून असे वाटते, की त्याने नुकतेच एखाद्या प्राण्याला गिळले आहे, कारण त्याचे पोट मध्यभागी फुगल्यासारखे दिसते. बोटीत बसलेले नशीबवान आहेत, की अॅनाकोंडा कोणालाही इजा करत नाही, तो पाण्यात जंगलाच्या दिशेने पोहू लागते.
तुम्ही चित्रपटांमध्ये खूप मोठा अॅनाकोंडा पाहिला असेल, पण वास्तविक जीवनात तुम्ही इतका मोठा अॅनाकोंडा क्वचितच पाहिला असेल. धक्कादायक असा हा व्हिडिओ आहे. untold_nature नावाने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 18 लाखांपेक्षा जास्तवेळा पाहण्यात आले आहे, तर 60 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत.