मुंबई : काही प्राणी (Animal Video) शांत स्वभावाचे असतात. त्याचबरोबर काही प्राणी (Monkey Viral Video) प्रचंड रागीट असतात. काही प्राणी इतके चपळ असतात की, खेळता-खेळता कधी त्यांना राग येईल हे कुणीचं सांगू शकत नाही. विशेष म्हणजे काही प्राणी पिंजऱ्यात असल्यानंतर अधिक हिंसक असतात. तिथं त्यांच्याशी पंगा घेणं अनेकांना महागात पडतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. काही लोकं आपल्यासाठी कशी समस्या निर्माण करतात हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. सध्या इंटरनेटवरती (internet) व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन तुम्हाला अंदाज आला असेल. एका मुलीने एका माकडाशी वैर घेतल्यानंतर काय झालंय पाहा व्हिडीओमध्ये.
एक मुलगी प्राणी संग्रहालयात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मुलीने तिथं बंदिस्त असलेल्या माकडाला परेशान केलं आहे. त्यानंतर ते माकड मुलीला कशा पद्धतीने धडा शिकवतं हे सुध्दा पाहायला मिळालं आहे. माकडं अशा पद्धतीने बदला घेईल याचा तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार करु शकत नाही. हे मात्र नक्की माकडं हे अतिशय चपळ असतं, त्याचबरोबर त्यांना अधिक खोडकर म्हणून ओळखलं जातं. काही गोष्टी माकडांच्या विरोधात झाल्या तर ते सगळं खराब करुन टाकतात. काहीवेळेला लोकांना अशा पद्धतीने धडा शिकवतात की, तो त्यांना कायमस्वरुपी लक्षात राहिलं. व्हिडीओमध्ये एक मुलगी एका माकडाला परेशान करीत आहे. मुलीने चुकीची वर्तणुक केल्यामुळे माकड अधिक चिडलं आहे. त्यानंतर त्या मुलीची केसं ओडत आहे.
व्हिडीओमध्ये माकडं त्या मुलीचे केसं ओडतं आहे. त्या मुलीच्या आजूबाजूला असलेली लोकं त्या मुलीची मदत करीत आहेत. विशेष म्हणजे तिथं असलेला पुरुष त्या मुलीच्या बजावासाठी अधिक प्रयत्न करीत आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर युजर्स विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत.