दिवसाढवळ्या चोर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून घेतात,अशा अनेक घटना आपण ऐकत असतो.अशा वेळी रस्त्यावर बेवारस डलेल्या दागिन्यांचे काय होईल याची कल्पना करा ? याचीच परीक्षा पाहण्यासाठी एका मुलीने तिच्या लाखोंच्या दागिन्यांसोमबत एक प्रयोग करून पाहिला,त्याचा रिझल्ट पाहून तुम्हालाही धक्का बसेल. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या बोनेटवर मुलीने तिचे सोन्याचे दागिने ठेवून दिले आणि अर्ध्या तासानंतर ती परत आली तेव्हा तिला ते सगळे दागिने तिथेच, त्याच ठिकाणी अतिशय सुरक्षित दिसले. या व्हिडिओने इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
आता हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं हे कोणतं शहर आहे, जिथे इतके ईमानदार लोक राहतात. खरंतर हा व्हिडीओ यूएईच्या दुबईमधील आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लेयला अफशोनकर हिचा हा प्रयोग पाहून सगळेच आश्चर्यचकित झालेत. दुबई हे सगळ्यात सेफ,सुरक्षित शहर मानलं जातं. तेच चेक करण्यासाठी लेयलाने हा अनोखा प्रयोग केला. तिने तिचे सर्व दागिने काढून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या बोनेटवर ठेवले आणि तिथून निघून गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
अर्ध्या तासाने ती जेव्हा परतली तेव्हा गळे दागिने कारच्या नेटवर तसेच ठेवल्याचा लेयलाचा दावा आहे. त्या अर्ध्या तासात तिथून अनेक लोक गेले, परंतु कोणीही दागिने चोरण्याचा प्रयत्न केला नाही, उलट एका महिलेने खाली पडलेले कानातले उचलून पुन्हा बॉनेटवर ठेवले.
इथे पहा व्हिडीओ
@leylafshonkar या नावाने इन्स्टाग्रामवर शेअर झालेला व्हिडीओ काही क्षणातंच प्रचंड व्हायरल झाला. 24 तासांहून कमी वेळात या व्हिडीओला 80 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून 10 लाखांच्या ापास लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय. तर अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एकदा पाकिस्तानमध्ये असं काही ट्राय कर, असं एकाने लिहीलं. तर भारतात असं काही केलं असतं तर दागिन्यांसोबतच कारही गायब झाली असती ताई, अशी कमेंट एकाने केली. ही दुबईची नव्हे इस्लामिक लॉ ची कमाल आहे, सर्वांना त्यांचे हात प्रिय आहेत, अशा शब्दात एकाने कमेंट केली.