मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल (Stunt Viral Video) होण्यासाठी कधी कोण काय करेल हे कोणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर कधी कोणाचा व्हिडीओ व्हायरल होईल हे सुध्दा कोणी सांगू शकत नाही. तरुण आणि तरुणी प्रसिद्ध होण्यासाठी जीव धोक्यात घालून व्हिडीओ तयार करीत आहेत. खतरनाक व्हिडीओ (Viral Video) तयार करीत असताना आतापर्यंत अनेकांचा जीव देखील गेला आहे. काही लोकांच्यावरती पोलिसांनी कारवाई सुध्दा केली आहे. सध्या एका मुलीचा स्कुटीवरती स्टंट करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल (trending video) झाला आहे. त्या तरुणीची थोडीसी जरी चुकी झाली, तरी मोठा अनर्थ होऊ शकतो असं अनेकांनी म्हटलं आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हायरल व्हिडीओ अनेक पाहायला मिळतात. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी स्कुटीवरुन उडी घेत असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. त्या मुलीने साडी नेसलेली आहे. त्या मुलीने स्टंट करायच्या आगोदर डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. त्यानंतर स्कुटीच्या मागच्या बाजूला उभी राहून हवेत उडी मारली आहे. त्या मुलीने हवेत उडी मारल्यानंतर तिला रस्त्यात उभं राहायचं आहे. परंतु त्या मुलीचा बॅलेन्स बिघडल्यानंतर ती रस्त्यावर पडली आहे.
ज्यावेळी हा स्टंट चालू होता, तो पाहण्यासाठी एका मुलीने आपली स्कुटी थांबवली आहे. हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती एकाने शेअर केला आहे. व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओला पाच लोकांनी लाईक सुध्दा केले आहे. काही लोकांनी त्या मुलाला चांगलेचं सुनावले आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की, साडी घालून हे फालतू नाटक करीत आहे. दुसरा व्यक्ती म्हणत आहे की, फक्त लाईकसाठी मुर्खपणा करत आहे मुलगी, काही लोकांना त्या मुलीचं डेरिंग अधिक आवडलं आहे.