Animal fighting video : तुम्ही जनावरांना त्रास दिला नाही तर ते देखील कोणालाही त्रास देत नाहीत, असे म्हटले जाते. यातील काही प्राणी अपवाद आहेत, जसे की सिंह, वाघ, बिबट्या इत्यादी, कारण ते मांसाहारी प्राणी आहेत. त्यांना न डिवचणे चांगले आहे, कारण त्यानंतर त्यांचा राग एखाद्याचा प्राणही घेऊ शकते. त्यांच्याशी मस्ती करणे धोकादायक आहे. राग हा कधीकधी पाळीव प्राणी जसे शेळी यांनाही येतो, परंतु ते मांसाहारी प्राणी नसल्यामुळे त्यांना जास्त घाबरण्याची गरज नाही. सध्या सोशल मीडियावर (Social media) एका शेळीचा (Goat) एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये ती रागात दिसत आहे आणि त्या रागात ती एका मोराशी भिडते आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करते, पण मोरही कमी हुशार नाही. तोही तिच्याशी दोनहात करतो. हा व्हायरल व्हिडिओ मजेसीर आहे.
व्हिडिओमध्ये शेळी आणि मोर समोरासमोर असल्याचे तुम्ही पाहू शकता. यामध्ये शेळी रागावलेली दिसत असून ती आपल्या शिंगाने मोरावर हल्ला करते, मात्र तिचे शिंग मोरापर्यंत पोहोचताच मोर लगेच हवेत उडून पलीकडे उडतो. तो हे अनेक वेळा करतो. शेळी मोरावर अनेकदा हल्ला करते आणि प्रत्येक वेळी तीच युक्ती अवलंबून पळून जाते. अशी ही शेळी आणि मोर यांच्यातली मजेशीर लढत रंगत जाते.
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा मजेदार व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अद्भुत गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘तुमच्या सामर्थ्यावर नेहमी विश्वास ठेवा, देवाने प्रत्येकाला संकटांचा सामना करण्यास सक्षम केले आहे’. अवघ्या 9 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 2500हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे.
सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने काव्यात्मक शैलीत लिहिले आहे, की तुमच्या क्षमतेवर तुम्ही विश्वास ठेवा आणि जर तुम्हाला इतरांकडून कमी अपेक्षा असतील तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल’, तर दुसऱ्या यूझरनेही अशीच प्रतिक्रिया दिली आहे.
अपनी सामर्थ्य पर हमेशा भरोसा करें,
ईश्वर ने सभी को मुसीबतों से टकराने योग्य बनाया है.#सुप्रभात pic.twitter.com/AgD9lxC4OQ— Dipanshu Kabra (@ipskabra) February 28, 2022