मुंबई : समुद्राच्या पाण्यात किती प्राणी आहेत, त्याचबरोबर तसे कसे दिसतात याचं अद्याप मोजमाप झालेलं नाही. प्रत्येकवेळी पाण्यातील एखाद्या नव्या (Trending News) प्राण्याची माहिती मिळते. ज्यावेळी पाण्यातील एखादा नवीन प्राणी दिसतो. त्यावेळी त्याचा फोटो किंवा व्हिडीओ अधिक व्हायरल (Fish Viral Video) होतो. काही प्राणी दिसायला इतके सुंदर असतात की, पाहतचं रहावं असं वाटतं. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (viral news) झाला आहे. त्यामध्ये एक पफर फिश (puffer fish) आहे, पपर फिश पाहून अनेकांना धक्का बसला आहे, काही लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यापासून हसतं आहेत. काही लोकांना तो आंबा असं वाटलं आहे.
ट्विटरवरती Massimo यांनी पफर फिशचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. पफर फिशचं नाव कधी तुम्ही ऐकलं आहे का ? तो एक असा मासा आहे, जो स्वतःमध्ये पाणी भरतो. विशेष म्हणजे ही या माशाची संरक्षण यंत्रणा आहे. बाकीच्या माशांमध्ये आणि या माशांमध्ये हा फरक आहे. अशाचं एका पिवळ्या पफर माशाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पफर फिशचा रंग हा एखाद्या गावठी पिकलेल्या आंब्यासारखा असतो. काही लोकांना सुरुवातीला पाण्यात वाहताना पाहून आंब्याचे डोळे, तोंड, कान बाहेर आल्याचे दिसले. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पिवळ्या रंगाचा पफर मासा आहे असं समजलं. या माशाला गोल्डन पफर फिश असेही म्हणतात.
Arothron meleagris, commonly known as the guineafowl puffer can inflate thanks to a rapid gulping of water into a distensible stomach, which stretches its elastic skin and promotes the erection of small spinules
[xixi6862: https://t.co/eKuYilyYIg]pic.twitter.com/a0APgSvr5j
— Massimo (@Rainmaker1973) June 16, 2023
त्या माशाचा व्हिडीओ पाहून ट्विटरवरती मजेशीर कमेंट आल्या आहेत. एकाला असं वाटलं की, तो आंबा पाण्यात पोहत आहे. तर एका युझरने मोठा लिंबू असल्याचं म्हटलं आहे. काही नेटकरी व्हिडीओ पाहत असताना नाराजी व्यक्त करीत आहेत. काही लोकांची नाराजी फक्त ही आहे की, माशांना का परेशान करीत आहात. एका नेटकऱ्याने या माशाला आंबा असं नाव दिलं आहे.