ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO

| Updated on: Jan 03, 2025 | 6:38 PM

हल्ली लग्नामध्ये वधू-वर यांच्या खास एन्ट्रीचा एक ट्रेंडच सुरु झाला आहे. मात्र अशा वेळी एन्ट्री घेताना केलेल्या प्लॅनिंगमध्ये असं काही घडत की ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही! असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO
Follow us on

लग्नसराईला सुरुवात झाली असून आता आपल्याला सोशल मीडियावर त्यासंबंधीचे अनेक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना पाहिला मिळतात. हे व्हिडिओ इतर व्हिडीओपेक्षा इतक्या वेगाने व्हायरल होतात असतात. कारण लोकांना असे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात. त्यातच भारतीय लग्नात पैसा पाण्यासारखा ओतला जातो. कमवणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न कमी असले तरी तो स्वतःच्या लग्नावर मोकळेपणाने खर्च करतो. तसेही लग्नाचे बजेट आणि तामझाम काळाच्या ओघात वाढत चालला आहे. आता वेडिंग प्लॅनर्स इतके भव्य इव्हेंट्स आयोजित करतात की पाहणारेही म्हणतात आम्हीही आमच्या लग्नात असं काहीतरी करू.

अनेकदा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या लग्नाला गेले असाल तर तेव्हा वधू-वरांना वेगवेगळ्या पद्धतीने लग्न मंडपात एन्ट्री घेताना पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही, कारण प्रत्येक वधू-वराचे स्वप्न असते कि त्यांच्या लग्नाची एन्ट्री ही ग्रँड पद्धतीने व्हावी. पण काही वेळा ग्रँड एन्ट्रीच्या नादात अपघात होतात. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात लग्नाच्या ग्रँड एन्ट्रीसाठी स्पार्कल गनचा वापर आणि फटाक्यांमुळे नवरदेवाच्या फेट्याला आग लागते. ते पाहून तिथे उपस्थित लोकं अचानक काय झाले पाहून आश्चर्यचकित होतात.

 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्नसमारंभात वधू वर हे लग्नमंडपात एन्ट्री घेताना दिसत आहेत,ज्यात समोर कॅमेरामॅन त्यांची ही एन्ट्री रेकॉर्डिंग करत असतो.अश्यातच वधू- वर स्टेजच्या दिशेने जात असताना वरातीमधील काही माणसं स्पार्कल गनने फटाक्यांची आतिषबाजी करताना दिसताय. पण या दरम्यान नवरदेवाच्या फेट्यावर ठिणगी पडते आणि फेट्याला आग लागते पण सुदैवाने कॅमेरामनची नजर त्याच्यावर पडते. त्यानंतर क्षणाचा विलंब न करता कॅमेरामॅन धावत येतो आणि डोक्यावरील फेटा काढून टाकतो. त्यामुळे मोठी दुर्घटना टळते.

हा व्हिडिओ इन्स्टावर didwana_rj37__ नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे, हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिलं असून यावर कमेंट्स दिल्या जात आहेत. एका युजरने लिहिलं, आहे कि, ‘या व्हिडिओतून धडा घेण्याची गरज आहे, कधी कधी अशा एन्ट्रीची गरज भासत नाही,’ तर दुसऱ्यायुजरने लिहिलं, ‘हे सगळं एक नौटंकी आहे, हा आनंद व्यक्त करण्याचा मार्ग नाही.