गांधीनगर : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. तर काही व्हिडीओमध्ये डेरिंग पाहूनच तुफान व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पठ्ठ्याने थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पंगा घेतल्याचं दिसत आहे. मकर संक्रांती दिवशी अमित शहा यांनीही पतंग उडवली मात्र या एकाने त्यांची पतंग गुल केल्याचं पाहायला मिळालं.
Bhai Ne Amit Shah Ki Patang Kat Di 😂❤️pic.twitter.com/3p19THbBX2
— RVCJ Media (@RVCJ_FB) January 15, 2024
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक युवक पतंग उडवताना दिसत आहे. त्यानंतर त्याचा जोडीदार आणि तो आनंदी झाल्याचं पाहायला मिळाले. त्यानंतर कॅमेरा दुसऱ्या टेरेसकडे गेल्यावर तिथे गर्जी जमलेली असून मीडियाचे कॅमेरेही आहेत. तिकडून अमित शहा यांच्यकडे पाहतात आणि हसतात. व्हिडीओमधी दुसरा मुलगा बोलतो की, अमित शहा यांचा पतंग कापला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ गांधीनगर येथील असून अमित शहा यांनी उत्तरायणच्या सणाला हजेरी लावली होती. अमित शहा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओही शेअर केला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, पतंग तर सगळेच उडवतात. पतंग उडवल्यावर एकमेकांची पतंग गुल म्हणजेच दोरे एकमेकांना घासल्यावर ज्याचा दोरा तुटतो त्याची पतंग गुल होते. व्हिडीओमधील पठ्ठ्याने देशाच्या गृहमत्र्यांचीच पतंग गुल केली.