मुंबई : देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू होत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी देशात युद्धपातळीवर कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. त्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सर्व स्तरावर राबवला जातोय. मात्र, काही ठिकाणी लसीला घेऊन अविश्वास दाखवला जातोय. याच अविश्वासापोटी अनेकजण कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. ही गोष्ट लक्षात येताच अनेक ठिकाणी लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. लस घेतल्यानंतर अनेकांना उपहार किंवा भेटवस्तू देण्यात येत आहेत. दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये तर कोरोना लस घेतल्यानंतर चक्क बियर भेट म्हणून दिली जातेय. (Gurugram restaurant offering free beer those who vaccinated themselves with Corona vaccine)
लसीकरणाला प्रोत्साहन म्हणून देशात अनेक ठिकाणी नागरिकांना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जात आहेत. महिलांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यास गुजरातमध्ये त्यांना नोजपीन भेट म्हणून देण्यात आल्या. तसेच एका ठिकाणी सोने भेट म्हणून देण्यात आले. मात्र, दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राम य़ेथे ‘इंडियन ग्रिल रूम’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये कोरोना लस घेतल्याचे दाखवल्यानंतर चक्क एक बियर मोफत दिली जात आहे. कोरोना लस घेतल्याचे कार्ड दाखवा आणि एक बियर मोफत मिळवा असं या रेस्टॉरंटमध्ये सांगितलं जात आहे. या मोहिमेला ‘इंडियन ग्रिल रूम विथ व्हॅक्सिनेशन सेलिब्रेट’ असं नाव जेण्यात आलं आहे. ही ऑफर 5 एप्रिलपासून सुरु झालेली असून एक आठवडाभर मोफत बियरचा आनंद लोकांना मिळवता येणार आहे.
दिल्लीजवळच्या गुरुग्रामध्ये मोफत बियरची ऑफर समोर आल्यानंतर आता गुजरातमधूनसुद्धा लस घेतल्यानंतर मजेदार ऑफर दिल्या जात आहेत. गुजरातमधील राजकोट येथील एक संघटनेकडून लस घेतल्यानंर मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिनही वेळ मोफत जेवन मिळेल, असं या संघटनेनं सांगितलं आहे. दरम्यान, इंडियन ग्रिल रूम या रेस्टॉरंटने मोफत बियर देण्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांनी या ऑफरचे स्वागत केले आहे.
इतर बातम्या :
Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय?
(Gurugram restaurant offering free beer those who vaccinated themselves with Corona vaccine)