दिल्ली : सोळा वर्षे तो वॉण्टेड होता. पोलीस त्याला शोधून शोधून दमले होते. इंटरपोलने त्याला रेडकॉर्नर नोटी बजावली होती. अशा एका अंडरवर्ल्ड माफीयाच्या इंटरपोलने सोळा वर्षांनंतर मुसक्या आवळल्या आहेत. हा अंडरवर्ल्ड माफीया पोलीसांना सोळा वर्षांनंतर एका रेस्ट्रारंटमधून ताब्यात घेतले आहे. तो त्या रेस्ट्रारंटमध्ये पिझ्झा शेफ म्हणून काम करीत होता. त्याला अटक केल्यानंतर यंत्रणांनी मोकळा श्वास घेतला आहे.
इटलीच्या अंमली पदार्थांचे रॅकेट चालविणाऱ्या एका खतरनाक माफीयाला इंटरपोल तब्बल सोळा वर्षे शोधत होती. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, इंटरपोल त्याच्या शोधासाठी जंग जंग पछाडत होती. परंतू तो सापडत नव्हता. अखेर फ्रान्सच्या आल्प्स पर्वत रांगाच्या प्रातांतील एका रेस्टॉरंटमधून त्याला गुरूवारी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
आपल्या प्रतिस्पर्धी गॅंगच्या म्होरक्यांची एकामागोमाग हत्या करणाऱ्या आणि त्या प्रकरणात कोर्टातून सजा सुनावलेला एडगार्डो ग्रीको ( 63 ) पळाल्याने पोलीस त्याला सोळा वर्षे शोधत होत होती. अखेर त्याला पोलीसांनी शोधून काढले आहे. ग्रीकोला स्थानबद्ध करण्यात आले असून लवकरच तपासअधिकारी त्याला आता दंडाधिकारी कोर्टात सादर केले जा्णार असल्याचे गार्डीयन या वृत्तपत्राने म्हटले आहे.
दक्षिण इटलीच्या कॅलाब्रिया प्रदेशात असलेल्या खतरनाक ड्रंगहेटा नावाच्या गु्न्हेगारी टोळीचा ग्रीको सदस्य होता. त्याच्या प्रतिस्पर्धक टोळीच्या दोघा गँगस्टर स्टेफानो, ग्युस्पे बार्टोलोमियो यांची साल २००६ मध्ये हत्या केल्या प्रकरणी त्याला इटलीच्या कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा केली होती. त्या दोघांची हत्या केल्यानंतर पोलीसांना त्यांचे मृतदेह सापडलेच नव्हते त्याने त्यांचे मृतदेह एसिड टाकून नष्ट केल्याचा पोलीसांचा संशय आहे.
ग्रीको काही दिवसातच पोलीसांच्या ताब्यातून निसटला आणि 2014 पर्यंत तो कोणालाच दिसला नाही. या सोळा वर्षांत त्याने पाओलो दिमित्रियोच्या नाव धारण करीत विविध रेस्ट्रारंटमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्याने फ्रान्सच्या आल्प्स पर्वत परीसरात स्वत: चे कॅफे रोस्सीनी रेस्तरां उघडले. त्याने आपला रेस्ट्रारंटची लोकल टीव्ही आणि वृत्तपत्रातून जाहीरात करून रेसीपी देखील लिहील्या. मास्टर शेफ म्हणून त्याने दुसरे जीवन सुरू केले होते, परंतू त्याला पोलीसांनी शोधून काढलेच असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.