बाहेर गारांचा प्रचंड पाऊस, त्यात पक्ष्याला आसराच नव्हता, दुकानदाराने मग…; व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Apr 11, 2023 | 11:08 PM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक दुकानदार एका पक्ष्याला आत बोलावताना दिसत आहे. आणि बाहेर गारांचा पाऊस पडतो आहे, आणि पक्षी आसरा शोधत आहे.

बाहेर गारांचा प्रचंड पाऊस, त्यात पक्ष्याला आसराच नव्हता, दुकानदाराने मग...; व्हिडिओ व्हायरल
Follow us on

मुंबई : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात. कधी कधी ते व्हिडिओ पोटधरून हसायला लावणार असतात तर कधी कधी ते पाहून आणण थक्क होऊन जातो. असाच एक सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर गारा पडत असल्याचे दिसत आहे. तर त्याचवेळी आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये लोक सुरक्षित उभा असल्याचेही दिसून येत आहे. त्याचवेळी एक छोटा पक्षी जीव वाचवण्यासाठी म्हणून दुकानजवळ आला आहे. तो पक्षी आल्याचे पाहून दुकानदारही गेट उघडतो आणि पक्ष्याला आत बोलावतो आहे.

त्या गारांच्या पावसात भिजून आलेल्या पक्षाला आता घेतानाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे या व्हिडिओला लोकंही प्रचंड लाईक करताना दिसून येत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक दुकानदार एका पक्ष्याला आत बोलावताना दिसत आहे. आणि बाहेर गारांचा पाऊस पडतो आहे.

त्या गारांच्या पावसाता कोणत्याही जीवाला काहीही होऊ शकत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा नैसर्गिक संकटकालीन परिस्थितीमध्ये दुकानदाराने त्या चिमुकल्या पक्ष्याला दुकानात घेऊन अनोख्या माणुसकीचे दर्शनही घडवले आहे.

 

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. @Buitengebiden नावाच्या एका ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे – ती व्यक्ती खूप महान आहे. तर कमेंट करताना दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, यापेक्षा सुंदर व्हिडिओ मी कधीच पाहिला नाही.