मुंबई : सोशल मीडियावर (social media) रोज असंख्य व्हायरल होतात. त्यापैकी काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना इमोशनल करुन जातात. त्याचबरोबर संघर्षमय आयुष्य सुध्दा लोकांना दाखवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Handicap Delivery Agent Video) झाला आहे. त्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती ऑनलाईन फूड डिलीव्हरीचं (online food delivery) काम करीत आहे. दिव्यांग तरुण ते काम इतक्या मेहनतीने करतोय की, व्हिडीओ पाहताना लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. त्याचबरोबर अनेकांना त्या व्हिडीओमुळे जिद्दीने मेहनत कशी करायची असते, हे सुध्दा शिकायला मिळत आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत.
ट्विटरवरती हा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये दिव्यांग फुड डिलिवरी एजंट दिसत आहे. आयुष्यात प्रचंड संघर्ष केल्यानंतर सुध्दा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसत आहे. संघर्ष करणाऱ्या त्या तरुणाच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. हा व्हिडीओ लोकांना प्रेरणा द्यायला पुरेसा आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्या व्हिडीओला कमेंट केल्या आहेत. झोमॅटोने डिलीवरी बॉयला आपला हिरो आहे असं उत्तर दिलं आहे.
Hats off to this man #Zomato #zomatoindia pic.twitter.com/36AyCdcPsB
— Himanshu (@himanshuk783) February 8, 2023
तुम्ही तुमच्या आयुष्यात निराश आहात किंवा मेहनत करायला कमी पडत आहात, तर हा व्हिडीओ तुमची हिंमत नक्की वाढवेल एवढं मात्र नक्की, हिमांशु नावाच्या एका व्यक्तीने @himanshuk783 त्याच्या अकाऊंटवरुन ट्विटरवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. भले व्हिडीओत दिसणारा तरुण दिव्यांग आहे. परंतु त्याच्या स्वत :च्या गरजा भागवण्यासाठी तो मोठा संघर्ष करीत आहे. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांनी सलाम केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरती शेअर केला आहे.