Happy Mother’s Day: मातृदिनानिमित्त काही खास मेसेज, अशा व्यक्त करा भावना

| Updated on: May 09, 2021 | 9:47 AM

या मातृदिनी तुम्ही तुमच्या आईला एखादा छान मेसेज, ग्रिटींग्स पाठवून शुभेच्छा देऊ शकतो. (Mother's Days Wish messages)

Happy Mother’s Day: मातृदिनानिमित्त काही खास मेसेज, अशा व्यक्त करा भावना
mothers day 3
Follow us on

Happy Mother’s Day 2021 मुंबई : ‘आई’ म्हणोनी कोणी, आईस हाक मारी ती हाक येई कानी, मज होय शोककारी, ही कविता ऐकली तरी आपल्या डोळ्यासमोर तुमची आई येते. आई ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे, जी आयुष्यभर कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्या मुलांवर प्रेम करते आणि त्यांना प्रत्येक सुख-दु:खात साथ देते. आज मातृदिन..या निमित्ताने प्रत्येकाने आईप्रति प्रेमाची भावना व्यक्त करावी. याच निमित्ताने गुगलने मातृदिनाचे डुडल साकारत सर्वांना मातांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Happy Mother’s Days Wish messages WhatsApp Status)

दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. आज 9 मे.. म्हणजेच मदर्स डे, मातृदिन.. यंदा कोरोनामुळे आपल्याला घराबाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे या मातृदिनी तुम्ही तुमच्या आईला एखादा छान मेसेज, ग्रिटींग्स पाठवून शुभेच्छा देऊ शकतो.

मातृदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेक ग्रिटिंग्स (Greetings), शुभेच्छा संदेश व्हायरल होत असतात. यातील काही स्पेशल संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आईचा दिवस स्पेशल करायचा असेल तर तुम्हीही हे ग्रिटिंग्स, SMS, Quotes, Wishes, Images व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून शेअर करु शकता.

गुगलकडून डुडल साकारत शुभेच्छा

google doodle

मातृदिनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या शुभेच्छा 

 

मदर्स डेचा इतिहास काय?

मातृदिन हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला होता. जेव्हा एना जार्विस नावाच्या मुलीने तिच्या आईचे स्मारक बांधले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. कारण, ती तिच्या आईची शेवटची इच्छा होती. नंतर, तिने आईच्या निधनानंतर तीन वर्षे असेच केले आणि त्यानंतर तिने सर्व मातांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली आणि हा दिवस अमेरिकेत मातृदिन म्हणून साजरा करण्यात आला.

हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा करण्यासाठी त्यांनी मोहीमही सुरु केली. मात्र, तिची ही विनंती नाकारली गेली होती. पण, 1941 मध्ये एका प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात आली आणि हे जाहीर करण्यात आलं की आजपासून मे महिन्याचा प्रत्येक दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जाईल. (Happy Mother’s Days Wish messages WhatsApp Status)

संबंधित बातम्या : 

Happy Mother’s Day 2021 | मातृदिन कधीपासून साजरा केला जातोय, कशी झाली सुरुवात? जाणून घ्या याचा इतिहास

Mother’s Day 2021 : कोरोना काळात घरच्या घरी साजरा करा ‘मदर्स डे’, या आहेत पाच टीप्स