Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध 9व्या दिवशीही सुरू असून, रशियन सैन्याने सतत बॉम्बचा वर्षाव करून शहराला भग्नावस्थेत बदलले आहे. असे असूनही, रशियाचे अध्यक्ष युक्रेनचे सैनिक आणि लोकांचे मनोधैर्य तोडण्यात अपयशी ठरले आहेत. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याला नऊ दिवस झाले आहेत, पण नाटो कारवाई करत नाही. युक्रेनने लष्करी मदत मागितल्यावर नाटोने (NATO) हात वर केले. आता सुप्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) याचा आनंद घेऊ लागले आहेत. त्यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर एक मजेदार मीम (Meme) शेअर केले आहे, जो पाहून आणि वाचून लोकांमध्ये हशा पिकला. युक्रेन-रशिया वादात पाश्चिमात्य देशांची ही वृत्ती लोकांना आवडली नाही, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर पाश्चिमात्य नेते आणि नाटो यांच्या ट्रोलिंगला सुरुवात झाली आहे. आता व्हायरल होत असलेला हा फोटो पाहा, तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
हा फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आणि लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ज्याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की या फोटोला शेकडो रिट्विट्स आणि हजारो लाइक्स आले आहेत. यासोबतच यूझर्सकडून यावर आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.
Seen on the roads… pic.twitter.com/38cJEfx7jR
— Harsh Goenka (@hvgoenka) March 4, 2022
हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या या फोटोला लोक पसंत करत आहेत. एका यूजरने या फोटोवर कमेंट करत लिहिले, की ‘मामला इंटरनेशनल सोच लोकल.’ तर दुसऱ्या यूझरने लिहिले, की युक्रेनला नाटोने फसवले आहे. दुसऱ्या यूझरने लिहिले, की ‘फोटो मजेदार आहे पण कटू सत्य आहे. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Hangal Saheb predicted this long back pic.twitter.com/A2ArIXYXqz
— SMR PRASAD (@PRASADSMR) March 4, 2022
अरे सर रोड पर नहीं, सोशल मीडिया मार्ग पर देखा होगा।?
— Avinash Ranjan*?? (@ranjan884) March 4, 2022
?Nice one!
Think Global Act Local!!— Mandar R Deo (@Mandarkalyan) March 4, 2022