Harsh Goenka Tweet : उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा त्यांच्या ट्विटर अकाउंटवर त्यांच्या फॉलोअर्ससाठी मनोरंजक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत असतात. हर्ष गोएंका यांचं एक ट्विट (Tweet) सध्या वेगानं व्हायरल (Viral) होत आहे, जे केंद्रीय अर्थसंकल्प 2022(Union Budget 2022)शी संबंधित आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, की जेव्हा त्यांनी त्यांच्या कोणत्याही मित्राला सामान्य अर्थसंकल्पावर त्यांचं मत विचारलं तेव्हा त्या मित्रानं त्याला प्रतिसाद म्हणून एक व्हिडिओ पाठवला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बुलेटप्रमाणं सायकल मॉडिफाय करून चालवताना दिसत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)यांनी मंगळवारी सलग चौथ्यांदा संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यासोबतच सोशल मीडिया यूझर्सनी ट्विटरवर सामान्य बजेटबाबत आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
सायकल की बुलेट?
आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनीही एक मजेदार ट्विट केलं, जे व्हायरल झालं. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलंय, की मी हे सरकार आवडत नसलेल्या माझ्या एका मित्राला मी म्हटलं, की हे चांगलं बजेट आहे! अर्थव्यवस्थेचं इंजिन आता वेगानं धावेल, तुला काय वाटतं? त्यामुळे प्रत्युत्तर म्हणून त्यानं मला हा व्हिडिओ पाठवला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बुलेट चालवत असल्याचं तुम्ही पाहू शकता. पण कॅमेरा अँगल बदलला की आरशासारखं सगळं स्पष्ट होतं. वास्तविक, ही व्यक्ती बुलेट चालवत नाही तर मॉडिफाय केलेली सायकल चालवत आहे.
व्हिडिओ यूझर्सकडून लाइक
अवघ्या 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 57 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचवेळी, 2400हून अधिक लोकांनी या पोस्टला लाइक केलं आहे. सुमारे 300 लोकांनी रिट्विट केलं आहे. हा आकडा सातत्यानं वाढतोय. उद्योगपती गोएंका यांच्या या पोस्टवर त्यांच्या फॉलोअर्सनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
I told my friend who doesn’t like this government “A fine budget! The engines of economy will now move faster. What do you think of it?”
He sent me this reply…
pic.twitter.com/In636XorPK— Harsh Goenka (@hvgoenka) February 1, 2022
फेव्हिकॉलचं ट्विटही होतं चर्चेत
याआधी उद्योगपती हर्ष गोयंका यांनी फेव्हिकॉल आणि दारूबाबत एक ट्विट केलं होतं, ज्याची खूप चर्चा झाली होती. त्यांनी ट्विटरवर गंमतीनं विचारलं, ‘बॉन्डिंगसाठी कोणतं चांगलं आहे, फेव्हिकॉल की अल्कोहोल?’ यावर, फेव्हिकॉल कंपनीकडून एक मजेदार उत्तर आलं, हे जाणून तुम्ही देखील म्हणाल, ‘याला विनोदबुद्धी म्हणतात. कंपनीनं लिहिलं,’ एका संध्याकाळसाठी किंवा आयुष्यभरासाठी तुम्हाला कोणतं बंधन हवं, हे तुमच्यावर अवलंबून आहे.’