Russia Ukraine war : सोशल मीडियावर सेलिब्रिटी खूप सक्रिय असतात. परंतु भारतात असे काही उद्योगपती आहेत जे त्यांच्या फॉलोअर्सचे मनोरंजक आणि सर्जनशील पोस्ट करण्यासाठी ओळखले जातात. RPG समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका (Harsh Goenka) हे त्यापैकीच एक. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या विनाशकारी युद्धाशी (War) संबंधित त्यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. आपल्या पोस्टमध्ये उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक व्हिडिओ (Video) शेअर करून युक्रेनवर रशिया इतका नाराज का आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊ या उद्योगपती गोएंका यांनी काय शेअर केले आहे, जे लोकांना हसवत आहे. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी 42 सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, जी एका हिंदी चित्रपटातील गाणे आहे. ज्यामध्ये राज कपूर गाताना दिसत आहेत.
राज कपूर या गाण्यात म्हणत आहेत, की ‘तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी..’ हा व्हिडिओ युक्रेन आणि रशियामधील युद्धावर अगदी तंतोतंत बसत आहे. कारण युक्रेनने नाटोचे सदस्य व्हावे, असे रशियाला वाटत नाही. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. चला तर मग हा व्हिडिओ पाहू या.
Why Russia is unhappy with Ukraine: pic.twitter.com/FNS6Qy0Jik
— Harsh Goenka (@hvgoenka) March 9, 2022
युद्धाच्या 14व्या दिवशी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे, की त्यांना नाटोचे सदस्यत्व नको आहे. ते म्हणतात, मला वाटते नाटो अजून युक्रेनला स्वीकारायला तयार नाही. यासोबतच झेलेन्स्की म्हणाले, की युक्रेनला असा देश अजिबात नको आहे, जो गुडघ्यावर पडून काहीतरी मागतो. तसेच असा राष्ट्रपती व्हायला मला आवडणार नाही. आता हा रशियाच्या धमकीचा परिणाम आहे, की आणखी काही हे माहीत नाही, पण उद्योगपती हर्ष गोयंका यांच्या व्हिडिओ पोस्टचा लोक खूप आनंद घेत आहेत.
उद्योगपती हर्ष गोयनका यांनी शेअर केलेला गाण्याचा व्हिडिओ 1963मध्ये आलेल्या ‘दिल ही तो है’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सीएल रावल आणि पीएल संतोषी यांनी केले आहे, तर बीएल रावल हे त्याचे निर्माते आहेत. यात राज कपूर आणि नूतन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.