मुंबई : आजचं जग खूप फॅशनेबदल झालंय. अगदी कुणालाही पाहा. जो कुणी दिसतोय तो कोणत्या न कोणत्या फॅशनमध्ये तुम्हाला दिसून येईल. कुणी अगदी अनोख्या स्टाईलने (style) केस कापलेलं दिसेल. तर कुणी पूर्णपणे वेगळे कपडे घालून फिरताना दिसून येईल. विशेषत: हेअर (hair) स्टाईलचा विचार केल्यास आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या केशरचना पहायला मिळतात. अनेक लोक आपले केस लाल, पिवळे, हिरवे अशा विविध रंगाचे करुन फिरताना दिसतात. तर कुणी डोक्यावर सरडा बसल्यासारखे केस कापल्याचंही तुम्हाला पहायला मिळेल. विशेष म्हणजे जगात आता फॅशनेबल लोकांची काही कमी नाहीये. लोक आता केस वाढवून किंवा कमी करून नवीन हेअर स्टाईल देण्याचा प्रयत्न करतायेत. अलीकडे असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हिडीओमध्ये एक मुलगा दिसून येतोय. या मुलाची हेअरस्टाईल चर्चेचा विषय बनली आहे. त्याची अनोखी हेअर स्टाईल पाहून तुम्हालाही हसू येईल. तुम्ही हा व्हिडीओ पाहून खळखळून हसाल.
व्हायरल झालेल्या आणि चहुकडे चर्चा असलेला व्हिडीओ तुम्ही पाहिल्यास फार मजेशीर वाटेल. व्हिडीओच्या सुरुवातीला या मुलाच्या डोक्यावर फक्त केस असल्याचं दिसून येईल. पण कॅमेरा जसजसा फिरतो तसतसं सत्य समोर येऊ लागतं. खरं तर मुलाने एका बाजुने केस काढले होते. पण दुसऱ्या बाजूनं काही केस दिसतायेत. तेही फक्त डोक्याच्या मागच्या आणि पुढच्या बाजुलाच आहेत. अशी अनोखी स्टाईल असलेला हा प्रकार तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल. हा एक अतिशय मजेशीर व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसाल.
या मजेशीर व्हिडीओवर अनेक रंजक प्रतिक्रिया आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायल होत असलेला हा व्हिडीओ पृधावी स्मार्ट नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला नवीन हेअर स्टाईल असं कॅप्शन देण्यात आलंय. या व्हिडीओला आतापर्यंत आठ लाखापेक्षा अधिक लोकांनी बघितलंय. तर 81 लाख व्ह्यूज आहेत. पाच लाखांपेक्षा अधिक लाकंनी या व्हिडीओला लाईक केलंय. सोबत लोकांनी व्हिडीओ पहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.