अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे. तसतशी या संदर्भातील बातम्या येऊ लागल्या आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा सध्या परदेशात क्रुझवर सुरु आहे. याआधी गुजरातच्या जामगरात तारंकाची मांदियाळी प्री-वेडींगला अवतरली होती. येत्या 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचे शुभमंगल Jio World Convention Centre मध्ये होणार आहे. त्या जिओ वर्ल्ड सेंटरच्या लिफ्टचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातील लिफ्ट जगातील सर्वात मोठी लिफ्ट असल्याचे म्हटले जात आहे. या लिफ्टचे वैशिष्ट्ये म्हणजे एकाच वेळी ती तब्बल 200 जणांना वाहून नेऊ शकते…आहे ना कमाल…
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा धाकटं रत्न अनंत अंबानी आणि उद्योगपती तसेच एन्कोर हेल्थकेअर या कंपनीचे सीईओ वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट हीच्या येत्या 12 जुलैला होऊ घातला आहे. गेल्या चार महिन्यांपासून या विवाहाची जगभरात चर्चा सुरु आहे. कारण या विवाहाला जगातील सर्व प्रसिद्ध हस्तींची असलेली उपस्थिती…गायिका रिहाना पासून ते शकीरा यांनी या प्री – वेडींग सोहळ्याला हजेरी लावून बक्कळ बिदागी वसुल केली आहे. परंतू आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या लेकाचं लग्न आहे म्हटले की बॉलिवूडच्या मंडळींना वराती म्हणून बोलावणं तर आलंच..मग आताही ही मंडळी क्रुझवर गेली आहेत सोहळ्यासाठी युरोपला…
अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाची पत्रिका व्हायरल होत आहे. त्यातील माहीतीनूसार येत्या 12 जुलै रोजी हा विवाह संपन्न होणार आहे. या विवाहाचे स्थळ बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर असल्याचे म्हटले जात आहे. याच आलिशान इमारतीत एप्पल आयफोन विक्रीचे देशातील पहिले सेंटर स्थित आहे. या Apple कंपनीच्या iPhone ची जगात चर्चा असते. आता भारतातही आयफोनची दोन स्टोअर उघडली आहेत. त्यापैकी एक सेंटर जिओ वर्ल्ड सेंटर आणि दुसरे दिल्लीत उघडण्यात आले आहे. या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये Apple च्या शोरुममध्ये नोकरी करण्यासाठी MBA झालेले विद्यार्थी देखील रांगा लावून उभे होते.
जगातील सर्वात मोठ्या लिफ्टचा व्हिडीओ येथे पाहा –
The world’s largest passenger elevator is at Jio World Centre, in Mumbai and can carry more than 200 people at once
— Science girl (@gunsnrosesgirl3) June 15, 2024
जिओ वर्ल्ड सेंटरची लिफ्ट ही जगातील सर्वात मोठी लिफ्ट म्हटली जाते. या लिफ्टमध्ये एकाच वेळी 200 जण सामावू शकतात. त्यामुळे या लिफ्ट पाहायला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते. या आलिशान लिफ्टचा व्हिडीओ एक्स हॅण्डल @gunsnrosesgirl3 या अकाऊंटने शेअर केला आहे. त्याला भरपूर व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ 4.7 हजार युजरनी लाईक केला आहे.