नवी दिल्ली : सोशल मीडीयावर आता एका बेबी स्ट्रोलर गाडीतील तान्ह्या बाळाला एका रस्त्यावर फिरत असलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान दाखवित वाचविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या माणसाने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच या बाबा गाडीला रोखल्याने बाळाचे प्राण वाचल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेत आजी बरोबर असलेला हा तिचा भाचा वाचल्याने आजीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर कॅलिफोर्निया येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक आजी आपल्या तान्ह्या भाच्याला बेबी गाडीतून घेऊन प्रवास करताना दिसत आहे. मात्र, तिची कार धुण्यासाठी उभी असताना अचानक बेबी गाडी ( स्ट्रोलर ) वाऱ्याने हायवेच्या दिशेने सरकल्याने ती आजी जीवाच्या आकांताने तिला पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. परंतू ती ठेचाकाळत गुढघ्यावर आपटल्याने तिला उठताच येत नाही. अशा वेळी अचानक तेथे देवदूत बनून एक व्यक्ती येते आणि बेबी गाडी रस्त्यावरील वेगाने जाणाऱ्या वाहनांना धडकणार इतक्यात हा देवदूत या बाळाला वाचविताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूपच पाहिला जात आहे.
हाच तो व्हिडीओ..
एक आजीबाई आपल्या कारला बाहेर काढीत असताना अचानक वारा सुटल्याने तिची बेबी कार वाऱ्याच्या वेगाने हायवेच्या दिशेने सरकत जाते. त्याच वेळी ती आजी धावून तिला थांबवायला जाते तर खाली पडते. आणि तिला वेदनेमुळे तिला पटकन उठता येत नाही. तेवढ्यात रॉन नेसमन त्या बेबी गाडीला हाताने थांबवतात. आणि त्या आजीबाईंकडे त्यांच्या भाच्याला सुखरुप सोपवतात.
रॉन नेसमन यांच्या या प्रसंगावधानाबद्दल कौतूक करण्यात येत आहे. रॉन नेसमन आपल्या गर्लफ्रेंडच्या मृत्यूमुळे डीप्रेशनमध्ये असून त्यांना जॉब मिळत नसल्याने ते फिरत असताना त्यांना ही बाबा गाडी वाऱ्याच्या वेगाने हायवेजवळ जाताना दिसली आणि त्यांनी वेगाने पुढे जात या बाबा गाडीला हाताने पकडून बाळाला जीवनदानच दिले. त्याच्या या पराक्रमानंतर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत त्यांना आता अनेक ठिकाणाहून नोकरीसाठी बोलावण्यात येत आहे.