व्हायरल व्हिडीओ: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ एक ऑफिसमधील असल्याचं दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये एक तरुणी गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावर डान्स करत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
व्हायरल व्हिडीओमधील तरुणी कोण?
‘छम्मक छल्लो’ गाण्यावर एक तरुणी ऑफिसमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील तरुणीचं नाव हिमानी आहे. या तरुणीने शाहरुख खान आणि करीना कपूरच्या गाण्यावर डान्स केला आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडीओमधील तरुणीच्या एक्सप्रेशनने लाखो चाहत्यांना घायाळ केलं आहे.
पाहा व्हिडीओ
हिमानीच्या या व्हिडीओवर लाखो चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याच बरोबर हिमानीचा हा व्हिडीओ आता पर्यंत 4 लाख 67 हजार लोकांनी पाहिला आहे. हिमानीच्या या डान्सचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे. हिमानीचा डान्स चाहते देखील थक्क झाले आहेत.