Hotel Room : हॉटेल रुममध्ये घुसताच अगोदर 10 वेळा ‘या’ गोष्टी चेक करा, नाही तर…

| Updated on: Aug 20, 2024 | 12:30 PM

Hotel Safety Tips : पर्यटनावेळी आपण हॉटेलमध्ये थांबतो. तिथल्या सर्वच गोष्टींवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण कधी कधी हा बिनधास्तपणाच आपल्याला अडचणीत आणू शकतो. हॉटेल रुममध्ये घुसताच अगोदर 10 वेळा 'या' गोष्टी नक्की चेक करा.

Hotel Room : हॉटेल रुममध्ये घुसताच अगोदर 10 वेळा या गोष्टी चेक करा, नाही तर...
हॉटेलमध्ये घुसल्यानंतर या चुका टाळा
Follow us on

पर्यटनाला जाणे, विविध प्रदेश, संस्कृती, निसर्ग पाहणे अनेकांच्या आवडीचे काम आहे. अनेक जण धार्मिक ठिकाणी जातात. काही जण नैसर्गिक पर्यटन करतात. अशा ठिकाणी विसाव्यासाठी, आरामासाठी हॉटेल, कॉटेजचा पर्याय निवडतात. आपण डोळे झाकून तिथल्या सेवावर, माणसांवर विश्वास ठेवतो. त्यांच्या आदरातिथ्याला भुलतो. पण हा बिनधास्तपणाच आपल्याला अडचणीत आणू शकतो. या टेक्नॉलॉजीच्या युगात काही जण आपल्या खासगी क्षणाचा गैरवापर करण्याची पण शक्यता असते. तेव्हा हॉटेलमध्ये घुसल्यानंतर या गोष्टींचा तपास जरूर करा.

खासगी क्षणाचा गैरफायदा

हॉटेलमध्ये थांबल्यानंतर अनेक जणांच्या खासगी आयुष्याबाबतची माहिती उघड झाल्याचे, त्यांच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यानंतर अनेक जणांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याची उदाहरणं आहेत. काही जण ब्लॅकमेलिंगसाठी तर काही प्रकरणात असे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून येते. तेव्हा सावज होण्याअगोदरच सावध व्हा.

हे सुद्धा वाचा

तुमची माहिती करु नका शेअर

हॉटेलमध्ये थांबल्यानंतर तिथल्या इतर अनोळखी व्यक्तींना तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. तुमची खासगी माहिती पण देऊ नका. अनेकजण गप्पांच्या ओघात वाहत जाऊन नको ती माहिती अनोळखी व्यक्तीला देतात. त्याआधारे फसवणुकीचे प्रकार घडल्याचे समोर आले आहेत. रिसेप्शनवरुन किल्ली घेतल्यानंतर अनोळखी व्यक्तीला तुमच्या रुममध्ये घेऊन जाऊ नका. सलगी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीपासून सदैव सावध राहा.

हॉटेलमध्ये तुमची रुम सुरक्षित ठिकाणी आहे का? तिथले फर्नीचर, दरवाजे व्यवस्थित लागतात की नाही, खिडक्यांना ग्रिल्स आहेत का? याची पण चाचपणी करा. रुममध्ये इतर दुसऱ्या बाजूने आत येण्याचा मार्ग तर नाही ना, याची पण खातरजमा करा. पडद्याआड काही आहे का, याची माहिती घ्या.

ऑनलाईन बुकिंग करत असला तर हॉटेलचा दर्जा, त्याची प्रसिद्धी आणि इतर बाबतीत ग्राहकांनी काय प्रतिक्रिया दिली ते अगोदर तपासा. त्या हॉटेलला किती रेटिंग दिले आहे, त्याचा रिव्ह्यू एकदा चेक करा. चांगली प्रतिक्रिया आणि सुरक्षेच्यादृष्टीने कोणाला चांगले रेटिंग दिले आहे, ते तपासूनच रुम बूक करा.

आरसा जरुर तपासा

हॉटेलमध्ये थांबल्यानंतर आरसा नीट तपासा. आरशाच्या मागील बाजूस एखादे गॅझेट, यंत्र लावले तर नाही ना, कॅमेरा लावला आहे का ते तपासा. दरवाज्याच्या छिद्रातून काय काय दिसते. घड्याळ असेल तर ते सुद्धा तपासा. आता कॅमेरे आणि व्हाईल रेकॉर्डिंग डिव्हाईस अनेक ठिकाणी लपवण्यात येते. त्याचा शोध घेण्याचे ॲप आता उपलब्ध आहेत. त्याचाही वापर करता येईल. रुमवर नेहमी नॉट डिस्बर्बचा बोर्ड लावलेला असू द्या. त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय कोणी रुममध्ये येणार नाही.

बेडच्या खाली काही लपवले तर नाही ना, मायक्रोफोन, कॅमेरा अथवा इतर डिव्हाईस तर नाही ना, हे एकदा तपासा. बेडखाली, आरसा, घड्याळ, फुलदाणी फोटोफ्रेम या वस्तूंमध्ये छुपे कॅमेरे लावण्याचे प्रकार समोर आल्याने तुम्ही सावध असणे गरजेचे आहे.