सोशल मीडियामध्ये कोडं (Online Puzzle) असलेला एखादातरी फोटो (Photo) कायम चर्चेत असतो. असे फोटो यूझर्सकडून मोठ्या प्रमाणावर पसंत केले जातात. व्हायरल(Viral) ही होतात. एखादा फोटो काढण्यासाठी म्हणजेच वेगळा असा फोटो क्लिक करण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यासाठी वेळही खूप द्यावा लागतो. मग कुठेतरी मनासारखा किंवा आपल्याला हवा असा फोटो क्लिक होतो. आता सध्या असा एक फोटो व्हायरल झालाय, ज्याला पाहून यूझर्स काहीसे गोंधळून गेलेत. जंगलात फोटोग्राफी करायची असेल तर अत्यंत संयम असायला हवा, हे या फोटोंतून दिसून येतं. मनासारखी पोझ नाही आली तर हिरमोड होतो. मात्र प्रयत्न केल्यानंतर काही क्षणासाठी का होईना, आपल्या मनासारखी परिस्थिती निर्माण होते आणि आपल्याला योग्य क्लिक मिळतो.
घेण्यात आली 1400 छायाचित्रं
व्हायरल होत असलेल्या फोटोत तुम्हाला चार हत्ती दिसत असतील. जर असं असेल तर तुम्हाला तुमचे डोळे तपासावे लागतील. तुमचा विश्वास बसत नसेल, पण या फोटोत 7 हत्ती आहेत. होय. हे खरं आहे. हा क्षण टिपण्यासाठी सुमारे 1400 छायाचित्रं घेण्यात आली! छायाचित्रकारानं अशी फ्रेम बनवली की तहान भागवण्यासाठी सर्व 7 हत्ती चित्रात आले.
शेकडो कमेंट्स
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो, की या ट्विटला शेकडो लाइक्स आणि रिट्विट्स मिळाले आहेत. यानंतर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी सांगितलं, की त्यांना 5 हत्ती दिसत आहेत, तर काहींनी सांगितलं 7..! या व्हायरल फोटोला व्हिडिओही जोडण्यात आलाय.
It took nearly 1400 clicks in 20 odd minutes to get this perfect sync frame of 7 Elephants quenching their thirst. CAN YOU SEE ALL 7#canonphotography @Canon_India @PMOIndia @moefcc pic.twitter.com/51WKgBqQBs
— WildLense® Eco Foundation ?? (@WildLense_India) January 19, 2022
व्हिडिओही शेअर
विशेष म्हणजे हत्ती पाणी पीत असताना फोटोग्राफरनं तो क्षण केवळ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला नाही, तर त्याचा व्हिडिओही चित्रित केला. अशा परिस्थितीत जेव्हा लोकांना फोटोमध्ये 7 हत्ती सापडले नाहीत, तेव्हा चित्रात 7 हत्ती असल्याचं सिद्ध करण्यासाठी ‘वाइल्डलेन्स इंडिया’नं हा व्हिडिओ शेअर केला आहे.