Humanity message video : सोशल मीडियावर (Social media) आपण विविध व्हिडिओ पाहत असतो. यातले काही व्हिडिओ आपल्या हृदयाला स्पर्श करून जातात. विनोदी व्हिडिओ, लहान मुलांचे, प्राण्यांचे व्हिडिओ यासह काही भावुक (Emotional) व्हिडिओही असतात. त्या माध्यमातून काहीतरी संदेश (Message) देण्याचा प्रयत्न केला जातो. सध्याचं जग हे वेगवान झालं आहे. यात प्रत्येकजण पैशांच्या मागे लागलाय. यात त्याला माणुसकीचा विसर पडत चाललाय. नात्यांचा विचार न करता त्याचा विसर पडणं हे आता नवीन राहिलेलं नाही. त्यामुळे माणुसकी जिवंत ठेवायला हवी. याच विषयावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. माणसानं माणसाशी माणुसकीनं वागलं पाहिजे, असाच काहीसा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलाय. यूझर्सनाही हा व्हिडिओ खूप आवडलाय. माणसानं कितीही चांगली अथवा वाईट परिस्थिती आली, तरी माणुसकी सोडू नये, असा संदेश यातून मिळतो.
व्हिडिओमध्ये तीन मित्र दाखवलेत. त्यातल्या एकाकडे पैसा आल्यानं तो मित्रांना पार्टीसाठी विचारतो. मग त्यांचं पार्टी करायचं ठरतं. तिघांमधला एकजण बाहेर असताना ज्यूसवाल्याकडून ज्यूस मागतो, त्यावेळी ज्यूसवाल्या काकांची तब्येत बिघडते. यावेळी तो मुलगा त्यांची विचारपूस करतो. त्यांना बाजुला बसवून स्वत: ज्यूसचा ठेला चालवतो. हे सगळं सुरू असताना त्याचे दोन मित्र तिथं येतात आण ज्यूस ऑर्डर करतात, मात्र आपल्या मित्राला पाहुन हे दोघे आश्चर्यचकित होतात. व्हिडिओचा पुढचा भाग संदेशाचा आहे. तो तुम्हाला पाहिल्यावरच लक्षात येईल.
यूट्यूबवर मि. रोशन (Mr Roshan) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 17 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 18+ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ‘Insaaniyat‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यातून दिलेला संदेश लोकांना भावलाय. त्यामुळे त्याला लाइकही मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. तसंच कमेंट्सही लोक भरभरून करत आहेत. (Video courtesy – Mr Roshan)