मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : एका छताखाली रहायचं म्हणजे भांड्याला भाडं लागणारच. पती-पत्नीमधील कुरबुर काही कमी नसतात. कशावरुन ना कशावरुन दोघांमध्ये वाजतेच. काही आपसातच ही गोष्ट निपटवतात. काही घरं तर रणांगणच असतात. तिथे रोज भाड्यांची दणआपट सुरु असते. तर वाद टोकाला जातात आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचते. पण मुंबईतील या महिला वकिलाने घटस्फोटासाठी कोणती कारणं असतात, याची यादीच समोर आणली आहे. काही कारण तर इतकी किरकोळ आहेत की तुम्ही डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाहीत. ही यादी वाचून काही महिलांनी डोक्याला हात लावला आहे. तर नवरोबांना आता करावं तरी काय असं झालं आहे. प्रकरण आहे तरी काय?
नकोसं झालंय हे प्रेम
तर तान्या अपाचू कौल असं या महिला वकिलांचं नाव आहे. त्या वकील तर आहेतच पण कंटेंट क्रिएटर पण आहेत. अनेकजण महिलांवरील अत्याचार आणि घटस्फोटासाठी पितृसत्ताक पद्धतीला जबाबदार धरतात. पण या महिला वकिलांनी घटस्फोटासाठी जी कारणं समोर आणली, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पती खूपच जास्त प्रेम करतो, असे एक कारण घटस्फोटासाठी असल्याचे कौल यांनी सांगितले. हे अतिरेकी प्रेम नकोसं झाल्याने काही महिलांना नवऱ्याकडून घटस्फोट हवा असल्याचे समोर आले आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केली यादी
महिला वकील कौल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर घटस्फोटाची कारणं समोर केली आहे. त्यांनी खास वकिली शैलीत घटस्फोटाची कारण समोर केली आहे. त्यांनी मुद्देसुद मांडणी केली आहे. घटस्फोटासाठी कोणती कारणं समोर आहेत, ते त्यांनी सांगितले. पती अथवा पत्नी या कारणांमुळे घटस्फोट मागतात.
व्हायरल झाली रील
ही रील अत्यंत व्हायरल झाली आहे. इन्स्टाग्रामवर ही रील त्यांनी शेअर केली. ही रील आतापर्यंत 1.6 दशलक्ष युझर्सनी पाहिली आहे. रीलच्या कॅप्शनमध्ये कौल यांनी लिहिले आहे की, मग लग्नच कशासाठी करायचं? या रीलवर युझर्सच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. पती प्रेमच करत नसल्याची अनेक महिलांची तक्रार आहे.