मुंबई : सोशल मीडियावर (Social media) रोज नव्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामध्ये चांगल्या आणि विनोदी गोष्टी लोकांना अधिक आवडतात. कारण विनोदी व्हिडीओ लोक पुन्हा-पुन्हा पाहतात. त्याचबरोबर शेअर सुद्धा करतात. संसारात भांड्याला भांडे लागतं असं म्हणतात, पण पती-पत्नीच्या भांडणात जेव्हा भांडं डोक्याला लागतं, त्यावेळी काय होतं हे व्हिडीओत (viral video) पाहायला मिळालं आहे. रस्त्यामध्ये पती-पत्नीचं भांडणं (Husband Wife Fight) सुरु झालं आहे. त्याचा व्हिडीओ लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून व्हिडीओला अनेक कमेंट आल्या आहेत.
ज्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे, त्या पेजचं नाव हसना जरूरी है असं आहे. पंधरा सेकंदाचा तो व्हिडीओ आहे. चाळीस-पन्नास वर्षाच्या दाम्पत्यामध्ये रस्त्यात वाद सुरु झाला आहे. विशेष म्हणजे पत्नी आपल्या पतीला भांड्याने मारहाण करीत आहे. त्यानंतर पतीने भांड हिसकावलं आणि पत्नीला मारण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यावेळी पत्नीने हातातं भांड खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पतीने पत्नीला हाताने मारहाण केली. हा सगळा प्रकार तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.
Couple goals… pic.twitter.com/kKhtFyZyGX
— Hasna Zaroori Hai (@HasnaZarooriHai) February 6, 2023
हा व्हिडीओ आतापर्यंत 44 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्या व्हिडीओ लाईक केले आहे. त्याचबरोबर व्हिडीओच्या खाली अनोख्या कमेंट सुध्दा आल्या आहेत. एकाने अजून सिंगल आहे ते बरं आहे असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.
हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु भांडण पाहणारे लोकं मजा घेत आहेत. सोशल मीडियावर रोज असे असंख्य व्हिडीओ फिरत असतात.