मुंबई : टीना डाबी (Tina Dabi) या नेहमी चर्चेत राहणाऱ्या अधिकारी आहेत. 2015 च्या यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) टॉप केल्यानंतर, आयएएस अधिकारी अतहर आमिर खान (Athar Aamir Khan) यांच्यासोबत प्रेम नंतर लग्न या सगळ्याच गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या . आता त्या प्रदीप गावंडेंसोबत (Pradip Gawande) लग्न करणार आहेत. त्यांनी स्वत:च या संदर्भातली माहिती दिली आहे. पण अश्यात सध्या एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा होतेय. ती म्हणजे अतहर आमिर खान यांना येणाऱ्या प्रपोजलची! जेव्हापासून टीना या प्रदीप यांच्याशी लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या तेव्हापासून अतहर यांना अनेक प्रपोजल आले. तुम्हाला खरं वाटणार नाही पण अतहर यांना एका दिवसात चार हजार मुलींनी प्रपोज केलंय. या सगळ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय.
आयएएस अधिकारी अतहर आमिर खान यांची पर्सनॅलिटी अनेक तरूणींना भुरळ घातले. त्यांना इन्स्टाग्रामवर पाच लाख नव्वद हजारांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. यात तरूण मुलींची संख्या जास्त आहे. त्यांच्या फोटोवर अनेकजणी हार्ट इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्यांच्या व्यक्तिमत्वाची तारिफ करत असतात. आता एका वेगळ्या गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा होतेय. अतहर यांना एका दिवसात 4 हजार प्रपोजल आले आहेत.
अतहर हे 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. ते या परिक्षेत देशात दुसरे आले होते. प्रशासनातील एक हुशार अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अतहर सध्या जम्मू काश्मिरच्या श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. शिवाय त्यांच्या पर्सनॅलिटीचेही अनेकजण चाहते आहेत. त्यांच्या हॅन्डसम लूकवर अनेक तरूणी फिदा आहेत.
2015 ला जेव्हा युपीएससी परिक्षेचा निकाल लागला त्यावेळी टीना डाबी देशात पहिल्या आल्या होत्या. तर अतहर देशात दुसरे आले होते. पुढे ट्रेनिंग आणि पोस्टिंगच्या काळात त्यांची मैत्री झाली. पुढे हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 2018 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांचं लग्न विशेष चर्चेत होतं. पण काहीच दिवसात दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती समोर आली. पुढे त्यांनी जयपूर फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. 2020 मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपल्या वेगळ्या वाटा निवडल्या.
WHO : प्रसूतीनंतर अशी घ्या ‘आई आणि बाळा’ ची काळजी ; काय आहेत ‘डब्लूएचओ’ ची मार्गदर्शक तत्वे
National Safe Motherhood Day: जाणून घ्या राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचे महत्त्व