मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या टीना डाबी (Tina Dabi)आज लग्नबंधनात अडकणार आहेत. 22 एप्रिल रोजी जयपूर येथील हॉटेल हॉलिडे इन (Holiday IN) या अलिशान हॉटेलमध्ये त्यांचे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.टीना यांनी जीवनसाथी म्हणून 2013 च्या बॅचचे आएएस अधिकारी प्रदीप गावंडे (Pradip Gawande) यांची निवड केलीय. या लग्नाची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करून दिलीय. या लग्नात महाराष्ट्र, मध्य प्रदेश सोबतच राज्यभरातील नामांकित सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. टीना डाबीच्या लग्नाची घोषणा झाल्यापासून हे कपल सतत चर्चेत असते. या लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे या दोघांच्या वयात मोठा फरक आहे. टीना दाबी प्रदीपपेक्षा 13 वर्षांनी लहान आहेत. टीना डाबी यांचे हे दुसरे लग्न असून प्रदीप पहिल्यांदाच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. समोर आलेल्या माहितीवरुन प्रदीप गावंडे हे महाराष्ट्रातील मराठी कुटुंबातील आहेत. त्यामुळे IAS टीना दाबी आणि प्रदीप गावंडे कोर्ट मॅरेज किंवा मराठी रितीरिवाजाने लग्न करू शकतात.
प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रचे. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1980 रोजी झालाय. त्यांनी औरंगाबादमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा यूपीएससीकडे वळवला. त्यांनी 2013 मध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. ते टीना डाबी यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. यापूर्वी 2020 मध्ये ते चुरू येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र, सध्या ते राजस्थान येथील राजस्थान पुरातत्व आणि संग्रहालय विभागामध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत.
दोघेही सोशल मीडियावर रोमँटिक पोस्ट शेअर करून आपलं प्रेम केले ‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार एका मुलाखतीत टीना म्हणाल्या होत्या – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रदीप आणि मी मे 2021 मध्ये आरोग्य विभागात एकत्र होतो. याच काळात त्यांची भेट झाली. सुरुवातीला आम्ही दोघे एकमेकांना मित्र म्हणून ओळखले. मग एकमेकांच्या कुटुंबीयांना भेटलो. हे सगळं वर्षभर चाललं. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही महिने मित्र म्हणून राहिल्यानंतर प्रदीपने मला प्रपोज केले.लग्नाची घोषणा झाल्यापासून दोघेही इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो पोस्ट करून आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. मात्र, लग्नापूर्वी या जोडप्याने त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला.
संबंधीत बातम्या :
20 April 2022 | 20 एप्रिल 2022, बुधवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
अंगारकी चतुर्थी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळ्यात मांदियाळी
Vastu | चुकूनही दुसऱ्याच्या या गोष्टी वापरू नका, वाईट काळ सुरु झालाच म्हणून समजा