मुंबई : आज ICC महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (Ind vs pak) आमने सामने खेळत आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या रोमांचक सामन्यादरम्यान (India Pakistan World Cup Match) सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये पाकिस्तानची महिला कर्णधार बिस्माह मारूफ तिच्या मुलासोबत भारताविरुद्ध मॅच खेळण्यासाठी सज्ज झालेली दिसत आहे. आयसीसीनेही (ICC) त्याचा हा खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानची महिला कर्णधार मारूफ त्याच्या टीम बसमधून उतरत आहे आणि त्याच्या कुशीमध्ये तिचे मुलं आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पाकिस्तानची महिला कर्णधार आई झाली होती. या संपूर्ण विश्वचषकादरम्यान मारूफ आपल्या मुलासोबत आपल्याला पाहायल मिळणार आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे.
नक्की काय आहे फोटोमध्ये ?
या फोटोमध्ये पाकिस्तानची महिला कर्णधार बिस्माह मारूफ तिच्या मुलासोबत बसमधून उतरताना दिसत आहे. लाल कपडे परिधान केलीली तिची परी तिच्या कुशीत अगदी सुरक्षित दिसत आहे. हा फोटो आयसीसीने शेअर केला आहे. या फोटोवर युजर्स खूप प्रतिक्रिया देत आहेत आणि पाकिस्तानच्या महिला कर्णधाराच्या या कृतील सर्व नेटकरी सलाम करत आहेत. या फोटोचे अनेक मीम देखील व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये “इस दुनिया मैं सबसे बडी योद्धा मॉं होती हैं “ असे अनेकांनी म्हटले आहे.
? Cricket kit
? Bags packed
? Baby cradlePakistan captain Bismah Maroof ready to face India ?#CWC22 pic.twitter.com/1ntYZfCzPY
— ICC (@ICC) March 6, 2022
क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करत होती कॅप्टन …आज बनली अनेकांचा आदर्श
बिस्माह मारूफ तिच्या गरोदरपणामुळे पाकिस्तानची महिला कर्णधार क्रिकेटला अलविदा म्हणणार होती. पण लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी यावेळी विश्वचषक खेळण्याचा निर्णय घेतला. आई झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात आलेल्या तिच्या पुनरागमनामुळे पाकिस्तानमधील महिला क्रिकेटला मोठी चालना मिळाली आहे. बिस्मा मारूफकडे सर्वजण आपला हिरो म्हणून पाहत आहेत. पाकिस्तानची महिला कर्णधार केवळ पाकिस्तानसाठीच नाही तर प्रत्येक देशाच्या खेळाडूंसाठी प्रेरणास्थान बनली आहे.
That’s Power ??
— J? (@jenzbenzy) March 6, 2022
पाहा कोण आहे संघात :
इंडिया : मिताली राज, स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रिच घोष , तानिया भाटिया, स्नेह राणा, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव , झुलन गोस्वामी, रेणुका सिंग.
पाकिस्तान : जावेरिया खान, सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ, ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना, सिद्रा नवाज (डब्ल्यू), डायना बेग, नशरा संधू, अनम अमीन.
काय आहे मॅचचं सध्याच स्टेटस
भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक (67), स्नेह राणा (53), स्मृती मानधना (52) आणि दीप्ती शर्माने (40) धावांची खेळी केली. या चौघींच्या दमदार फलंदाजीमुळे भारतीय महिला संघाला पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पूजा आणि स्नेहने एक अवघड परिस्थितीत संघाचा डाव सावरला. एकवेळ भारताचा डाव 200 पर्यंत तरी पोहोचेल? अशी मनात शंका निर्माण झाली होती. पण पूजा आणि स्नेहने संपूर्ण चित्रच पालटून टाकलं. दोघींनी पाकिस्तानच्या महिला गोलंदाजावर हल्लाबोल करत खोऱ्याने धावा वसूल केल्या. स्नेह राणाने 48 चेंडूत 53 धावांच्या खेळीत चार चौकार लगावले. पूजाने 59 चेंडूत 67 धावांच्या खेळीत आठ चौकार फटकावले.
संबंधीत बातम्या :
Wriddhiman Saha: ऋद्धिमान साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव समोर आलं, मानहानीची नोटीस पाठवणार
IND vs SL, 1st Test, Day 3, LIVE Score: सबुकछ रवींद्र जाडेजा, भारताने श्रीलंकेला दिला फॉलोऑन