नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : आता क्रिकेटच्या पंढरीत वारकरी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यंदा भारतात हा कुंभमेळा रंगणार आहे. आयसीसी मेन्स वर्ल्ड कप 2023 (ICC Men World Cup 2023) चा सोहळा भारतात होत आहे. ही तर क्रिकेटच नाही तर फॅन्ससाठी पण पर्वणी आहे. भारतात क्रिकेटचा नेहमीच जल्लोष दिसतो. क्रिकेटचा फीव्हर भारतावर चढणार आहे. भारतीयांच्या नसानसात क्रिकेटचा जलवा ओसंडून वाहणार आहे. भारताकडे या विश्वचषकाचं यजमान पद आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंतक्रिकेट सामने रंगणार आहेत. अर्थात क्रिकेट सामने (Cricket Matches) याची देही, याची डोळा पाहण्यासाठी चार महिन्यांपासूनच जय्यत तयारी सुरु झाली आहे. तरीही या सामान्याचे तिकीट मिळविण्यासाठी याठिकाणी नशीब आजमावता येईल.
10 टीमचा सहभाग
या विश्वचषकात दहा टीम सहभागी होतील. यामध्ये दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, नेदरलँड, न्युझीलँड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणीस्तान, भारतासह इतर देशाचा समावेश आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हे सामने होणार आहेत. त्यासाठी सर्वच टीम उत्साहित आहेत. या विश्वचषकावर नाव करण्यासाठी या टीम आपआपसात भिडतील.
आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 शेड्यूल
या विश्वचषकासाठी एकूण 48 सामने खेळण्यात येतील. यापूर्वीचा विजेता इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 5 ऑक्टोबर 2023 रोजी खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील चुरशीचा सामना 14 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादमध्ये होईल. अनेक सामने दिवस-रात्रीत होतील.
असे करा तिकीट बुक