AI ची कमाल ! इंडियन क्रिकेटर्स असते मुलगी, तर कसे दिसले असते ?

| Updated on: May 10, 2023 | 2:19 PM

टीम इंडियाच्या क्रिकेटपटू मुलगी असते तर ते कसे दिसले असते ? याची कल्पना करून एका व्यक्तीने AI च्या मदतीने काही फोटो बनवले आहेत, जे पाहून लोक थक्क झाले आहेत. शुभमन गिलचा फोटो तर अप्रतिम दिसत आहे.

AI ची कमाल ! इंडियन क्रिकेटर्स असते मुलगी, तर कसे दिसले असते ?
Image Credit source: instagram
Follow us on

AI Images Of Indian Cricketers : टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंचे (Team India Cricketers) लाखो फॅन आहेत. कोणाला धोनी आवडतो तर कोणाला विराट कोहली… पण की टीम इंडियाचे क्रिकेटर्स मुलगी असते तर ते कसे दिसले असते ? तुम्ही कधी अशी कल्पना केली आहे का ? शाहिद नावाच्या व्यक्तीने मिडजॉर्नी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ॲप ​​वापरून काही फोटो तयार केले आहेत. आणि त्याचा जो परिणाम समोर आला आहे, तो खरोखरच आश्चर्यकारक आहे. काही क्रिकेटपटूंचे चेहरे हुबेहूब महिलासांरखे दिसले आहेत, की कोणालाही ते खरंच वाटेल. AI च्या मदतीने बनवलेल्या क्रिकेटर्सच्या छायाचित्रांमधील शुभमन गिलचा लूक तर नुसता धुमाकूळ घालत आहे. तुम्ही सुद्धा ही चित्र पाहून अवाक् व्हाल..

आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या युगात जगत आहोत हे वेगळे सांगायला नको. याआधी कोणीही विचार केला नसेल की एक दिवस आपण फक्त एका क्लिकवर कोणालाही पत्र पाठवू शकू. आज AI च्या युगात लोक दररोज उत्कृष्ट मास्टरपीस तयार करत आहेत. शाहिदनेही असेच काही फोटो तयार केले असून त्याच्या यादीत विराट कोहली, शुभमन गिल, महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर, हार्दिक पांड्या, युवराज सिंग, रोहित शर्मा, शिखर धवन, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. विराटचे नाव ‘विद्या कोहली’, तर शुभमन गिलचे नाव ‘सुभद्रा गिल’ असे ठेवण्यात आले आहे. तूर्तास, या चित्रांवर एक नजर टाकूया.

 

AI च्या मदतीने तयार करण्यात आलेली क्रिकेटपटूंची ही छायाचित्रे नेटकऱ्यांना आकर्षित करत आहेत. इंस्टाग्रामवर @sahixd अकाऊंटवर तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या फोटोंना दोन हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर काहींनी हे चित्र पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. बऱ्याट लोकांना कमेंट्सही केल्या आहेत.

 

एका यूजरने लिहिले की, शुभमन गिल, माही आणि गंभीरचा लूक खूपच किलर दिसत आहे. तर दुसऱ्या युजरने, गंभीरचा महिला रूपातील फोटो पाहून तो सारा अली खानसारखा दिसत असल्याचे म्हटले आहे. तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, माझी आता खात्री पटली आहे की मेकअपच्या माध्यमातून कोणताही पुरुष स्वत:ला स्त्रीमध्ये बदलू शकतो.