पटना : बिहारची (Bihar) राजधानी पटनामधील (Patna) बिहटामध्ये अवैद्य खाणीचे उत्खनन सुरु आहे, त्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक पथक दाखल झाले होते. त्याचवेळी पथकावर जोरदार हल्ला झाला आहे. दोन पदाधिकारी गंभीर जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. महिला अधिकाऱ्यांना (bihar woman officer) आरोपीने फरकटले सुध्दा आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या अंगावर दगड सुद्धा फेकले आहेत. त्याचवेळी अधिकाऱ्यांची टीम त्यांच्यापासून कसंबसं सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हल्ला करणाऱ्या व्यक्ती हल्ला करीत आहेत. त्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत.
या संपूर्ण घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. त्याबरोबर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी ४४ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ५० वाहन त्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. त्या वाहनांचे चालक आणि मालक असे दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिटी एसपी यांनी मीडियाशी बोलताना एक गोष्ट सांगितली आहे की, त्यांना घटनास्थळी एक वायलेस सेट लावलेली स्कॉर्पियो सुध्दा सापडली आहे. ज्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना शोधण्याचं काम बिहार पोलिस करीत आहे. या सगळ्यांचा मास्टरमाईंड कोण आहे, त्याचा पोलिस शोध घेत आहेत. मागच्या कित्येक दिवसांपासून हे धंदे सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
#WATCH बिहार: पटना के दानापुर के बिहटा थाना क्षेत्र में अवैध रेत खनन करने वाले लोगों ने खनन विभाग की महिला अधिकारी को घसीटा और हमला किया।
(नोट: वीडियो में अभद्र भाषा का प्रयोग किया गया है। वायरल वीडियो की पुष्टि पुलिस ने की है।) pic.twitter.com/HCK6UFyOtx
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2023
देशात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने खाणींचे उत्खनन सुरु असल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. काहीवेळेला त्यांच्यावर कारवाई सु्द्धा करण्यात येते. परंतु नंतर पुन्हा असाचं प्रकार सुरु असल्याचं पाहायला मिळतं.