Importance of helmet and safety gears : प्रत्येक गोष्टीत सुरक्षितता आवश्यक आहे, मग तो रस्ता असो किंवा खेळाचे मैदान. विशेषतः रस्त्यावरून दुचाकी किंवा कार चालवताना हेल्मेट आणि सीट बेल्ट लावणे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण या दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्यामुळे कोणत्याही अपघातात चालकाचा जीव वाचू शकतो. सोशल मीडियावर असे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ज्यामध्ये अपघात होऊन वाहने अक्षरश: जागेवरून उडतात. अनेक अपघातांत वाहनचालकांना जीव गमवावा लागतो. हे अनेकदा अतिवेगवान वाहनांमध्ये दिसून येते. त्यामुळेच रस्त्यांवर सुरक्षेचे सर्व नियम नक्कीच पाळले जातात. सोशल मीडियावर सध्या एक अतिशय मजेदार व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरूण स्केटिंग करताना अपघाताचा बळी ठरतो. थोडक्यात काय, तर आपली सुरक्षितता महत्त्वाची आहे. कोणतेही स्टंट (Stunt) करताना त्याचे प्रशिक्षण (Training) आधी घेणे गरजेचे असते नाही तर असे हसे होते. त्यामुळे हेल्मेट गरजेचे असल्याचे या व्हिडिओ(Video)तून शिकायला मिळते.
आदळला भिंतीवर
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वत:च्याच धुंदीत स्केटिंग करताना दिसून येतो, परंतु उतारामुळे तो स्वतःचा तोल सांभाळू शकत नाही आणि थांबण्याच्या प्रक्रियेत तो खाली पडून भिंतीवर आदळतो. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की ती व्यक्ती आपला तोल कसा गमावते आणि अपघाताची शिकार बनते. तो ज्या प्रकारे भिंतीवर आदळला त्यामुळे त्याला खूप दुखापत झाली असावी. त्यामुळेच सर्वत्र सुरक्षितता आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
ट्विटर हँडलवर शेअर
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अतिशय मजेशीर गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले, की खेळातील हेल्मेट आणि सेफ्टी गियर्सचे महत्त्व जाणून घ्या, फक्त 4 सेकंदात’.
यूझर्सच्या मजेशीर कमेंट्स
4 सेकंदांचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. तो आतापर्यंत 2700हून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की हे नक्की विनापरवाना असेल, तर दुसऱ्या यूझरने ‘थोबड़ा पूरा बर्बाद हो गया होगा’. अशी विनोदी कमेंटही केली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या यूझरने ‘त्याचे डोके फुटले असावे’ असे लिहिले आहे.
स्पोर्ट्स में हेलमेट और सेफ्टी गियर्स का महत्व सीखें, सिर्फ 4 सेकेंड्स में… pic.twitter.com/vrl6MN3guA
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 9, 2022
आणखी वाचा :