Turtle boy born with shell: आपण कथा किंवा जादुई चित्रपटांमध्ये पाहिले असेल की जन्माच्या वेळी एखादी व्यक्ती अर्धा माणूस आणि अर्धा प्राणी म्हणून या जगात आला. प्रत्यक्षात मात्र असं काही घडत नसतं हे आपल्यालाही माहीत आहे. पण अमेरिकेत असं खरंच घडलं आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात अशा मुलाचा जन्म झाला आहे, ज्याच्या पाठीवर (back) वेगळ्या प्रकारची रचना आहे, जी कासवाच्या कवचासारखी (turtle sheel) दिसते.
खरंतर आपण अशा अनेक मुलांबद्दल ऐकले असेल, ज्यांचे वजन जन्माच्या वेळी सामान्यापेक्षा जास्त होते. एखाद्या मुलाच्या शरीरावर दाट केस असू शकतात किंवा एखादे बाळ शेपूट घेऊन जन्मलेले असू शकतात. तथापि, आज आपण ज्या मुलाबद्दल बोलत आहोत ते खूपच हआहे. त्या मुलाच्या पाठीवर कासवासारखे कवच आहे, जे पाहून त्याचे पालक अतिशय हादरले आणि हैराणही झाले.
बाळाच्या पाठीवर होते कासवासारखे कवच
हे विचित्र प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मुलाचे नाव जेम्स असून त्याचे वय आता 19 महिने आहे. जेम्सचा जन्म झाला तेव्हा त्याच्या त्वचेची दुर्मिळ स्थिती होती ज्यामुळे त्याच्या पाठीचा 75 टक्के भाग कासवाच्या शेलमध्ये झाकलेला होता. मूल पोटात असताना स्कॅनमध्ये असे काहीही आढळून आले नाही. शेवटी जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचे विचित्र रूप पाहून डॉक्टर, कर्मचारी आणि पालकांनाही आश्चर्य वाटले.
पहिल्यांदा वाटले जन्मखूण आहे , सत्य कळल्यावर सर्वजण झाले हैराण
35 वर्षीय महिलेला तिच्या मुलाच्या पाठीवर दिसलेली नक्षी ही जन्मखूण वाटली. मात्र तो आकार हळूहळू वाढत गेला. अखेर त्याची चाचणी करण्यात आली व त्यातील अहवाल पाहून आई-वडील दोघेही हादरले. त्या अहवालात असे आढळून आले की मुलाला दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे त्याची पाठ अशी आहे. हे ऐकून त्याचे आई-वडील सुन्न झाले. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी 2022 सालीच शस्त्रक्रियेद्वारे मुलाच्या पाठीवर वाढणारी गाठ काढून टाकली. मात्र आणखी एक शस्त्रक्रिया अजून बाकी असून ती झाल्यावर जेम्स बरा होऊ शकेल. या कासवाच्या कवचासारख्या पाठीमुळे जन्मानंतर तो त्याच्या पाठीवर झोपू शकत नव्हता, पण आता शस्त्रक्रियेनंतर त्याची ही समस्या दूर होईल व तो शांतपणे हवा तसा झोपूही शकेल.