नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या जोडप्याचे लग्न होते, तेव्हा ते एकत्र रहातात. आपल्या येथे मुलगी तिचे घर सोडून लग्नानंतर पतीच्या घरी रहाते. किंवा हे नवदाम्पत्य नव्या घरात शिफ्ट होतं आणि आपला संसार गोडीगुलाबीने सुरु करते. जगात सर्वसाधारण असाच रिवाज आहे. परंतू एका देशात काही नवीनच प्रकार सुरु झाला आहे. तो खूप पॉप्युलर होत आहे. येथे लोक लग्न तर करतात परंतू आपल्या प्रायव्हसीशी कोणताही समझौता करीत नाहीत.
तुम्हाला हे ऐकूण थोडं वेगळे वाटेल, परंतू जपानमध्ये ‘separation marriages’ नावाचे नवीनच कल्चरल खूपच प्रचलित झाले आहे. जपानच्या हिरोमी आणि हिडेकाजूची कहानी अशी आहे. त्यांचे लग्न अनेक वर्षांपूर्वी झाले आहे. त्याचं एक मुल देखील आहे. परंतू पती-पत्नी आजही एका घरात राहात नाहीत. त्यांची दोघांची घर एकमेकांपासून एक तासांच्या अंतरावर आहे. परंतू ते कधी एकत्र राहू इच्छीत नाहीत.
सेपरेशन मॅरेज ही संकल्पनाच वेगळी आहे. येथे लग्नानंतर पती-पत्नी आपआपल्या जगात स्वतंत्र आणि मुक्तपणे राहातात. ते एकमेकांवर प्रेम करतात आणि आधारही घेत असतात. मात्र त्यासाठी काही त्याग करीत नाहीत. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगायचे आहे. या संकल्पनेत त्यांना सिंगल आणि लग्न होण्याचा असा दोन्ही अनुभव मिळतो. हे नातं प्रेम आणि सन्मान यांचे आहे. मग ही जोडपी हे नातं टीकवून ठेवतात. बीबीसीच्या बातमीनूसार या जोडप्यांची लाईफस्टाईल एकमेकांपासून वेगळी असते, परंतू ते एकमेकांवर प्रेम करतात. अशा एकमेकांची प्रायव्हसी डीस्टर्ब न करता ते वेगवेगळ्या छताखाली रहातात.